*कोंकण एक्सप्रेस*
*एक पेड माँ के नाम‘ या उपक्रमांतर्गत वृक्षारोपण*
*वेंगुर्ला प्रतिनिधी (प्रथमेश गुरव)*
बॅ.खर्डेकर जयंती, लोकशाहीर अण्णाभाऊ साठे व लोकमान्य टिळक पुण्यतिथीचे औचित्य साधून राष्ट्रीय सेवा योजना, एनसीसी व इको क्लब मिशन लाईफ मंच अंतर्गत बॅ.खर्डेकर महाविद्यालयात वृक्षारोपण कार्यक्रम संपन्न झाला. ‘एक पेड माँ के नाम‘ या उपक्रमांतर्गत प्राचार्य डॉ.गोस्वामी यांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले.
यावेळी गटविकास अधिकारी वासुदेव नाईक, संस्था प्रतिनिधी सुरेंद्र चव्हाण, कनिष्ठ विभागाचे पर्यवेक्षक प्रा.शितोळे, इको क्लब प्रमुख प्रा.अरविद बिराजदार, इको क्लब अध्यक्ष गोपाळ नार्वेकर, इको क्लब समन्वयक कांबळे सर, व्यावसायीक विभागप्रमुख श्री.पाटील, एनएसएस विभाग प्रमुख जाधव, एनसीसी लेफ्टनंट प्रा.गायकवाड, स्टाफ सेक्रेटरी प्रा.विवेक चव्हाण, सर्व शिक्षक व विद्यार्थी उपस्थित हते.
गटविकास अधिकारी वासुदेव नाईक यांनी शासन उपक्रम वसुंधरा ६.० व वृक्षलागवडीचे महत्त्व यावर मार्गदर्शन केले. तर प्राचार्य गोस्वामी यांनी वृक्षलागवडीची गरज व जागतिक तापमान वाढ यांचे गांर्भिय पटवून दिले. प्रास्ताविक व सूत्रसंचालन प्रा.अरविद बिराजदार यांनी केले. तर आभार विरेंद्र देसाई यांनी मानले.

