*कोंकण एक्सप्रेस*
*पालकमंत्री नितेश राणे यांच्या प्रमुख उपस्थितीत ‘महसूल दिना’चे आयोजन*
*सिंधुदुर्गनगरी दि 31 (जिमाका)*
सामान्य नागरिक व शेतकऱ्यांना केंद्रबिंदू मानून महसूल विभाग कार्यरत असून विभागातील अधिकारी-कर्मचाऱ्यांचा गौरव करण्यासाठी दरवर्षी १ ऑगस्ट रोजी ‘महसूल दिन’ आयोजित करण्यात येतो. पालकमंत्री नितेश राणे यांच्या प्रमुख उपस्थितीत ‘महसूल दिना’ निमित्त विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. या कार्यक्रमात पालकमंत्री यांच्या हस्ते विविध दाखले वितरण, विशेष सहाय्य आर्थिक योजनेअंतर्गत लाभ वाटप कार्यक्रम तसेच महसूल विभागातील उत्कृष्ट अधिकारी आणि कर्मचारी यांचा गुणगौरव देखील केला जाणार आहे. उद्या १ ऑगस्ट रोजी सकाळी ११ वाजता जिल्हाधिकारी कार्यालयातील नियोजन सभागृहात हा कार्यक्रम होणार असून या कार्यक्रमाला नागरिकांनी उपस्थित राहण्याचे आवाहन निवासी उपजिल्हाधिकारी मच्छिंद्र सुकटे यांनी केले आहे.