वेंगुर्ले हायस्कूल चे मुख्याध्यापक प्रमोद कांबळे सरांचा सेवानिवृत्तीपर सत्कार

वेंगुर्ले हायस्कूल चे मुख्याध्यापक प्रमोद कांबळे सरांचा सेवानिवृत्तीपर सत्कार

*कोंकण एक्सप्रेस*

*वेंगुर्ले हायस्कूल चे मुख्याध्यापक प्रमोद कांबळे सरांचा सेवानिवृत्तीपर सत्कार*

वेंगुर्ला हायस्कूल वेंगुर्ला चे मुख्याध्यापक श्री प्रमोद दिनकर कांबळे आज 31 जुलै 2025 रोजी सेवा निवृत्त झाले. 26 वर्षाच्या प्रदीर्घ सेवेनंतर तसेच वेंगुर्ला हायस्कूल मध्ये 18 वर्षे शिक्षक पर्यवेक्षक, मुख्याध्यापक म्हणून काम केले. त्यांचा सत्कार शाळेचे माजी विद्यार्थी व भाजपा जिल्हा उपाध्यक्ष प्रसंन्ना उर्फ बाळु देसाई यांच्या हस्ते करण्यात आला . यावेळी माजी मुख्याध्यापक एस् .एस् .काळे सर , पालक शिक्षक संघाचे नितीन बांदेकर , आनंद परब , रवी थोरात सर , रमेश वाघमारे सर व पदाधिकारी उपस्थित होते .
यावेळी सत्कार प्रसंगी बोलताना प्रसंन्ना देसाई म्हणाले कि मुख्याध्यापक प्रमोद कांबळे सरांनी वेंगुर्ला हायस्कूल ची दहावीची निकालाची उज्वल परंपरा कायम ठेवली . तसेच त्यांनी मुख्याध्यापक पदावर काम करीत असताना विद्यार्थी कल्याण , शिस्त यामुळे हायस्कूल ला वेगळ्या ऊंचीवर नेऊन ठेवले . त्यामुळेच वेंगुर्ले शहरात त्यांनी आपली छाप पाडली .
आजच्या सेवानिवृत्तीपर निरोप समारंभाला पालक शिक्षक संघ , पदाधिकारी , सिंधुदुर्ग अध्यापक संघ पदाधिकारी, वेंगुर्ला तालुका क्रीडा पदाधिकारी यांनी शाल, श्रीफळ, बुके व भेटवस्तु देऊन सत्कार केला व भावी आयुष्य सुखी, समाधानी, आरोग्य दायी जावो यासाठी शुभेच्छा दिल्या.
यावेळी मुख्याध्यापक प्रमोद कांबळे सरानी सर्वांचे मनापासून आभार मानले. वेंगुर्ला शहर पालक हितचिंतक विद्यार्थी आजी, माजी विद्यार्थी यांचे सहकार्य लाभले त्यामुळे मला चांगले काम करता आले. सर्वांचे मनापासून आभार. मी सदैव आपल्या ऋणामध्ये राहीन ज्यावेळी शाळेला मदत लागेल त्यावेळेला मी सदैव मदत करीन असे सत्कार प्रसंगी मनोगत व्यक्त केले .
यावेळी संस्था प्रतिनिधी माजी मुख्याध्यापक श्री एस.एस. काळे सर व उपस्थित शिक्षकांनी व कर्मचारी वर्गाने सेवानिवृत्तीपर शुभेच्छ्या दिल्या .

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!