*कोकण Express*
*शिवसेना कलमठ विभागप्रमुख अनुप वारंग यांचे मिलिंद मेस्त्री यांच्यावर आरोप!*
कणकवली ः प्रतिनिधी*
भाजपा तालुकाध्यक्ष म्हणून पद घेत त्या पदाचा गैरवापर मिलिंद मेस्त्री कसे करतात हे अख्ख्या कणकवली तालुक्याला माहिती आहे. शिवसेनेवर आरोप करत असताना मेस्त्री यांनी आपली पार्श्वभूमी तपासावी. मेस्त्री बंधूंच्या त्रासा मुळेच कणकवली तालुक्यात अधिकारी हजर व्हायला पाहत नाहीत. काही महिन्यांपूर्वी कणकवलीतील एका शासकीय वैद्यकीय अधिकाऱ्याने मेस्त्री बंधूंच्या “आम्ही दोघे भाऊ, भाऊ कमिशन मिळून खाऊ” या वृत्तीचा पर्दाफाश केला होता. त्यामुळे शिवसेनेवर आरोप करताना मिलिंद मेस्त्री यांनी शंभर वेळा विचार करावा. अन्यथा त्यांचे अनेक कारनामे बाहेर येतील. असा आरोप कलमठ शिवसेना विभागप्रमुख अनुप वारंग यांनी केला आहे.
वारंग पुढे म्हणाले की, अनधिकृत बांधकामांचे बादशहा हे भाजपचे जिल्हाध्यक्ष राजन तेलीच आहेत. कणकवली शहरात भाजप जिल्हाध्यक्ष यांचीच बांधकामे अनधिकृत आहेत हे कणकवली नगराध्यक्षांनी यापूर्वीच जाहीर केले आहे. त्यावेळी मिलिंद मेस्त्री झोपून होते का? निव्वळ राजकारण हा धंदा बनवून त्या धंद्याच्या जीवावर आपला चरितार्थ चालविण्याचे काम मेस्त्री बंधू करतात. त्यामुळे शिवसेनेत ठेकेदार झाले असे सांगणाऱ्या मेस्त्री हे ठेकेदारांकडून कमिशन कशाप्रकारे मागतात हे ही संबंधित ठेकेदारांना विचारले तर समजेल. केवळ राणे यांच्या घरी पाणी भरायचे व आपली शर्टची इस्त्री न मोडता फिरायचे हाच या दोन्ही मेस्त्री बंधूंचा धंदा आहे. त्यामुळे यापुढे पुन्हा शिवसेनेवर आरोप करण्याची हिम्मत केलात तर मिलिंद मेस्त्री यांची “आम्ही दोघे भाऊ, भाऊ अधिकार्यांकडून कमिशन खाऊ ही पॉलिसी जनतेसमोर आणू. असे म्हणाले.