*कोंकण एक्सप्रेस*
*करूळ प्रशाला पालक शिक्षक संघ नूतन कार्यकारणीची निवड व गुणवंतांचा सत्कार*
*कणकवली ः प्रतिनिधी*
नाथ पै ज्ञान प्रबोधिनी करूळ प्रशालेच्या पालक शिक्षक संघाची सर्वसाधारण सभा नुकतीच पार पडली .सभेत सन 2025 या शैक्षणिक वर्षासाठी पालक शिक्षक संघाच्या नूतन कार्यकारणीची निवड करण्यात आली. तसेच सन 2025 -26 या शैक्षणिक वर्षात इयत्ता पाचवी ते नववी पर्यंत प्रथम क्रमांक प्राप्त आणि इयत्ता दहावीचे प्रथम तीन क्रमांक प्राप्त विद्यार्थ्यांचा गुणगौरव करण्यात आला. तसेच स्पर्धा परीक्षेत यश संपादन केलेल्या विद्यार्थ्यांचा सुद्धा गौरव करण्यात आला. पालक शिक्षक संघाच्या नूतन कार्यकारणीत अध्यक्ष म्हणून प्रशालेचे मुख्याध्यापक श्री. एल.एस.नारकर तर उपाध्यक्ष म्हणून सौ.सविता नारकर (करूळ), यांची निवड करण्यात आली. तसेच सौ श्रद्धा तेली (तिवरे),सौ.प्रतीक्षा सावंत (डामरे), श्री अनिल मेस्त्री (कोंडये), सौ.मृणाली चव्हाण (फोंडा कूर्ली), श्री मंगेश वर्दम (साकेडी), सौ.अश्विनी जाधव (हुमरठ), सौ.सुप्रिया राणे (वाघेरी), श्री पांडुरंग घाग(लोरे),सौ कविता पाटील (कूर्ली ).सौ दिव्या रासम (हरकुळ) ,सौ दिपाली पडवळ(आचिर्णे ),श्री दत्तात्रय रेवडेकर (फोंडा)यांची उपस्थित पालकांमधून सदस्य म्हणून निवड करण्यात आली. मुख्याध्यापक श्री नारकर सर यांनी प्रास्ताविक व अहवाल वाचन केले. संस्थेचे उपाध्यक्ष श्री अनुपजी कर्णिक यांनी प्रशालेमध्ये एआय रोबोटिक्स हा नवीन विषय सुरु करण्याबाबत पालकांना माहिती दिली. पालक या नात्याने सौ शिंदे मॅडम यांनी प्रशाले विषयी कृतज्ञता व्यक्त केली. श्री कदम सर यांनी विविध शासकीय योजनांची माहिती दिली. त्यानंतर संस्थेचे अध्यक्ष पद्मश्री मधु मंगेश कर्णिक यांनी शिक्षणासाठी सुद्धा घेतलेले कष्ट, बदलत्या युगा नुसार नवीन विषय कृत्रिम बुद्धिमत्ता सुरू करण्याबाबतचे मार्गदर्शन, तसेच प्रशाले विषयी गौवोद्गार काढले. ए आय विषय सुरू करण्यासंदर्भात श्री सहस्त्रबुद्धे आणि श्री.कृष्णमूर्ती सर यांनी विद्यार्थ्यांना पुढील आयुष्यात होणारे फायदे स्पष्ट केले. संस्था सदस्य, सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी, पालकवर्ग ,विद्यार्थी उपस्थित होते.निवेदन श्री मेस्त्री सर यांनी केले. आभार प्रदर्शन सौ.कुमठेकर मॅडम यांनी केले.