*कोंकण एक्सप्रेस*
*दि:१ ते 0७ ऑगस्ट २०२५ या कालावधीमध्ये जागतिक स्तनपान सप्ताह २०२५ होणार साजरा*
*सिधुदुर्गनगरी*
३०जागतिक स्तनपान सप्ताह दि:१ ते 0७ ऑगस्ट २०२५ या कालावधीमध्ये जागतिक स्तनपान सप्ताह २०२५ साजरा करण्यात येणार आहे. स्तनपानाच्या पद्धती सुधारण्यासाठीच्या प्रयत्नांना बळ देण्यासाठी जागतिक मोहीम म्हणून दरवर्षीप्रमाण यावर्षीही दि. १ते ७ ऑगस्ट २०२५ या कालावधीमध्ये जागतिक स्तनपान सप्ताह साजरा करण्यात येतो. स्तनपान करणाऱ्या मातांकरिता सुरक्षित वातावरण निर्मिती करणे, पोषण सुधारणा व बालपणीच्या पारंभिक विकासामध्ये निव्वळ स्तनपानाच्या भूमिकेवर भर देण्यासाठी जागतिक स्तनपान सप्ताह है एक महत्त्वपूर्ण व्यासपीठ आहे.
यावर्षीच्या जागतिक स्तनपान सप्ताहासाठी “Invest in breastfeeding, Invest in future” ही थीम केंद्र शासनामार्फत निश्चित करण्यात आली आहे. या दद्वारे मातेला तिच्या नवजात बालकास स्तनपान करण्यासाठी आवश्यक ते संपूर्ण सहकार्य द्यावयाचे असून तिला स्तनपना संदर्भात सर्व माहिती व गुणवत्तापूर्ण समुपदेशन मिळणे अपेक्षित आहे. सदर सप्ताहाची अंमलबजावणी करताना आरोग्य विभाग महिला व बाल विकास विभाग आणि सामाजिक कार्य करणाऱ्या सेवाभावी संस्थांच्या सहकार्याने स्तनपानाचे महत्व अधिकाधिक कुटुंबापर्यंत पोहोचवणे व याद्वारे जास्तीत जास्त मातांना बाळाच्या जन्मानंतर पहिले सहा महिने बाळाला निव्वळ स्तनपान देण्याबाबत प्रोत्साहित करणे कुपोषणाचे प्रमाण आणि अर्भक मृत्यू दर कमी करणे हा या सप्ताहाचा प्रमुख उद्देश आहे. सदर सप्ताहाअंतर्गत प्रामुख्याने खालील उपक्रम राबविणेत येणार आहेत. स्तनपानाकरिता स्वतंत्र खोली हिरकणी कक्ष स्थापन करणे अदययावत करणेपहिल्या सहा महिन्यांपर्यत बालकाच्या निव्वळ स्तनपानास प्रोत्साहन बटली बंद दूध व फॉम्र्युला दूधासव प्रतिबंध याबाबाबत जनजागृती ।शालेय स्तरावर प्रश्नमंजुसा स्पर्धा, चित्रलेखन स्पर्धा, निबंध स्पर्धा इ.चे अयोजनमाता व पालक बैठकोचे आयोजन स्तनपानाविषयक कार्यशाळांचे आयोजन निव्वळ स्तनपान विषयी समुपदेशन सत्रस्तनपान विषयी व्यापक जनजागृती आदी कार्यक्रमाचे आयोजन केले आहे