*कोंकण एक्सप्रेस*
*सद्य परिस्थितीत मतभेद करणाऱ्या पदाधिकाऱ्यांनी कोकणचा विकास आणि सन्माननीय राणे कुटुंबीय या बाबत सखोल अभ्यास करावा : अमित वेंगुर्लेकर*
*सावंतवाडी ः प्रतिनिधी*
राजकारण आणि समाजकारण यांच्या आकत्यारित सतत वावरणारा राजकीय प्रवाह जरी आपल्या पक्षाच्या हितासाठी सद्य परिस्थितीत होत असलेला मतभेद दूर करण्यासाठी आपल्यापरीने सक्षम प्रयत्न करत असेल तरही समोरची व्यक्ती ज्यांनी आता पर्यंत काही कारणास्तव पक्ष बदल केले आहेत,त्याबाबत नेमकं कारण काय होतं आणि काळाची गरज काय आहे याबाबत विचारातून आपली सत्ता स्थापन केली आहे.
परंतु या राजकीय प्रवाहात फक्त राजकारण या विषयावर अपवाद म्हणजे सन्माननीय राणे कुटुंबीय .
आजपर्यंत असा एकही कार्यकर्ता नसेल ज्याच्यासाठी सन्माननीय साहेबांनी आणि कुटुंबातील सदस्यांनी त्यांना अडीअडचणीत योग्य अभाळ केला नसेल,एवढेच नव्हे तर आज प्रत्येक सन्माननीय राणे समर्थक स्वतःच्या पायावर उभा आहे तसेच इतर कोणत्याही पक्षातील कार्यकर्ता असो किंवा सर्वसामान्य व्यक्ती असो आज पर्यंत सन्माननीय साहेबांच्या कार्यालयातून किंवा निवासस्थानातून रिकाम्या हाताने परतलेला नाही सिंधुदुर्ग जिल्ह्यातच. नव्हे तर महाराष्ट्रातील कानाकोपऱ्यात सन्माननीय राणेकुटुंबीय आणि जनहित याबाबत जमेची माहिती जनमान्यांना माहित आहे.
आणि हल्लीच्या काळातील राजकारण आणि काही समाज गैरसमज यांच्या विरोधात बोलण्यापेक्षा मी एक कट्टर राणे समर्थक म्हणून सुमारे वीस वर्षापेक्षा जास्त काळ प्रत्येक सुख दुःखात आमचे प्रेरणा स्थान सन्माननीय राणे कुटुंबीय यांच्या सोबत कायमस्वरूपी कार्यरत आहे तसेच शेकडो कट्टर राणे समर्थक एकमताने जिथे साहेब तिथे आम्ही मग पक्ष कोणताही असो याच भावनेने निर्णय घेऊन आज सिंधुदूर्ग जिल्ह्यातील जनतेच्या हितासाठी सन्माननीय दादा सन्माननीय वहिनी साहेब सन्माननीय निलेशजी सन्माननीय नितेशी राणे साहेब कुटुंबीय एक महत्त्वाचे सामाजिक आणि न भूतो न भविष्यति असे जनसेवा सहकार्य आपल्या प्रत्येक जनसामान्याला स्वातंत्र्य अधिकारात जगता यावे यासाठीच गेली कित्येक वर्षे सहकार्य करत आहेत
आमच्यासारख्या असंख्य सन्माननीय राणे समर्थक यांचे एकही पाऊल विरोधक ढासळू शकणार नाहीत याचे भक्कम उदाहरण अनेकवेळा या महाराष्ट्रातील कानाकोपऱ्यात वेळोवेळी ठोस पावले उचलून पटवून दिलं गेलंय.
त्यामुळे वायफळ चुकभुलीतील बातम्यांना भाव न देता आज पर्यंत प्रत्येक कार्यकर्त्याला मग तो पदाधिकारी असो किंवा सर्वसामान्य असो सन्माननीय राणे समर्थक हीच पदवी आणि याचा योग्य न्याय सन्माननीय राणे कुटुंबीय यांनी प्रत्येकांच्या अडीअडचणीच्या वेळेस दिलेला आहे आज त्यातील कित्येक विरोधकही आहेत पण मनापासून सन्माननीय साहेबांच्या बाबत आदर व्यक्त करतात अशा वेळेस राजकारण एका बाजूला ठेवून विचार केला तर असा कोणताही अविचार किंवा वायफळ चर्चा सन्माननीय राणे कुटुंबातील एकही सदस्याला विरोध करू शकत नाही
आमच्यासारखे कित्येक राणे समर्थक अवघ्या महाराष्ट्रातच नव्हे तर आजूबाजूच्या राष्ट्रातही कार्यरत आहेत पक्ष हा फक्त विभाज्य घटक आहे
सत्य हेच आहे की जिथे सन्माननीय राणे कुटुंबीय तिथेच प्रत्येक कट्टर राणे समर्थक त्यामुळे कोणीही याबाबत राजकारण न करता जैसे थे राहूनच काम करणार याबाबत शंका नाही असे मानवाधिकार न्याय सुरक्षा संगठन तर्फे प्रदेश सचिव श्री अमित वेंगुर्लेकर (कट्टर राणे समर्थक )यांनी पत्रकार माध्यमातून बोलताना सांगितले आहे