शिवसेना आचरा विभाग प्रमुख पदी संतोष कोदे यांची नियुक्ती

शिवसेना आचरा विभाग प्रमुख पदी संतोष कोदे यांची नियुक्ती

*कोंकण एक्सप्रेस*

*शिवसेना आचरा विभाग प्रमुख पदी संतोष कोदे यांची नियुक्ती*

*मालवण ः प्रतिनिधी*

शिवसेना जिल्हाप्रमुख दत्ता सामंत यांनी आचरा येथे झालेल्या शिवसेना कार्यकर्त्यांच्या बैठकीत आचरा विभागातील नवीन पदाधिकाऱ्यांच्या नियुक्त्या जाहीर केल्या यात आचरा विभाग प्रमुख पदी संतोष कोदे यांची निवड करण्यात आली .

आचरा विभागीय सचिवपदी शशिकांत नाटेकर ,अल्पसंख्यांक विभाग प्रमुख पदी मुजफ्फर मुजावर, चिंदर उपविभाग प्रमुख पदी पंढरीनाथ उर्फ भाऊ हडकर यांची निवड करण्यात आली तर आचरा पंचायत समिती प्रमुख पदी जयप्रकाश परुळेकर यांची निवड करण्यात आली. तर विभाग समन्वयकपदी पळसंब माजी सरपंच चंद्रकांत गोलतकर यांची निवड करण्यात आली. आचरा शाखाप्रमुख पदी अभिजीत सावंत, उपशाखाप्रमुख पदी उदयघाडी, विजय कदम तर सचिव पदी पंकज आचरेकर यांची निवड करण्यात आली आचरा शाखा सदस्य पदी पारवाडी अमर पळसंबकर वरची वाडी गुरुप्रसाद कांबळी, देऊळवाडी अभय भोसले, हिर्लेवाडी बाळकृष्ण हिर्लेकर, जामडूल ओम प्रकाश आचरेकर डोंगरेवाडी प्रमोद देसाई, काझीवाडा जावेद शेख, गाऊडवाडी योगेश गावकर, भंडारवाडी प्रसाद गावकर, पिरावाडी श्रीकांत पराडकर यांची निवड करण्यात आली. हाॅटेल राणेशाही येथील सभागृहात झालेल्या बैठकीत शिवसेना जिल्हाप्रमुख दत्ता सामंत यांच्यासह दादा साहिल, संतोष कोदे,विश्वास गावकर तालुकाध्यक्ष विनायक बाईत दीपक पाटकर आचरा सरपंच जेरॉन फर्नांडिस ,उपसरपंच संतोष मिराशी, जयप्रकाश परुळेकर डॉक्टर प्रमोद कोळंबकर ,मुजफ्फर मुजावर , अभिजीत सावंत चंद्रकांत कदम, महेंद्र घाडी, उदय घाडी,अजित घाडी,दत्ता वराडकर,पराग नलावडे यांसह बहुसंख्य शिवसेना कार्यकर्ते उपस्थित होते. यावेळी विभागीय समितीही सामंत यांनी जाहिर केली.यात बांदिवडे- प्रफुल्ल प्रभू आचरा- नीलिमा सावंत, डॉक्टर प्रमोद कोळंबकर ,त्रिंबक -आशिष बागवे, अशोक बागवे, बांदिवडे कोईळ श्यामसुंदर साटम, चिंदर -दत्ताराम वराडकर ,बांदिवडे कोईळ- पांडुरंग भांडे, वायंगणी- संजय सावंत, तोंडवळी -गणेश तोंडवळकर, तळाशील -संजय तारी,चिंदर नारायण सावंत आदींची निवड करण्यात आली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!