*कोंकण एक्सप्रेस*
*”व्हिल्स आॅफ स्किल्स ” बस च्या माध्यमातून बहूविधकौशल्य अभ्यासक्रमाची वारगावात सुरूवात*
*कासार्डे प्रतिनिधी : संजय भोसले*
वारगाव विकास मंडळ संचलित
शेठ महादेव वि. केसरकर माध्यमिक विद्यालय मौजे, वारगाव
दिनांक 26 -07- 2025
शैक्षणिक वर्ष 2025- 26 मध्ये कॉज टू कनेक्ट फाउंडेशन पुणे, च्या वतीने, वारगाव विकास मंडळ मुंबई, संचलित *शेठ महादेव वि. केसरकर माध्यमिक विद्यालय, मौजे वारगाव* तालुका कणकवली येथे *wheels of skills*बस च्या माध्यमातून बहुविध कौशल्य अभ्यासक्रमाची सुरुवात करताना पुढीलप्रमाणे नियोजनबद्ध कार्यक्रम करण्यात आला.
सर्वप्रथम *व्हील्स ऑफ स्किलस – बस* चे उदघाटन संस्थेचे कार्याध्यक्ष मा. श्री .सुधाकर नर यांच्या हस्ते श्रीफळ वाढवून आणि फित कापून करण्यात आले.
त्यानंतर स्वागत कार्यक्रम झाला त्यावेळी श्री. सुधाकर नर सर, शाळेचे मुख्याध्यापक श्री. हनुमंत वाळके सर, सहा. शिक्षिका सौ. स्नेहा कुबडे मॅडम, किर्ती बाक्रे मॅडम, सानवी ताम्हणकर मॅडम लिपिक श्री. सुधाकर कुलकर्णी सर. आणि शिक्षकेत्तर कर्मचारी आणि विद्यार्थी उपस्थित होते.
विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना श्री. सुधाकर नर सर बोलले की ” मुलांमध्ये कौशल्य, कला असतात पण बाहेर पडत नाहीत. मुलाचे पाय पाळण्यात दिसतात. या कौशल्य अभ्यासक्रमातून तुमचे कौशल्य जागृत करण्याची संधी तुम्हाला मिळाली, हे आपल भाग्य आहे. ”
मुख्याध्यापक श्री. वाळके सर मुलांना उद्देशून बोलले की – तुम्ही चांगल्या चौकस दृष्टीने चारही विभाग शिका आणि तुमची आवड ओळखून भविष्यात करिअर निवडा. यश लवकर आणि निश्चित मिळणार. आमचे मार्गदर्शन सपोर्ट आहेच.
सिंधुदुर्ग समन्वयक श्री. भोगले सर यांनी दोन वर्षाच्या अभ्यासक्रमाबद्दल मुलांना सर्व माहिती व ओळख करून दिली.
सौ कुबडे यांनी प्रशालेच्या वतीने सर्वांचे आभार मानले.
त्यानंतर श्री बिडये सर आणि श्री कासले सर यांनी ८ वी च्या विद्यार्थ्यांना विभागांची माहिती दिली.
त्यानंतर *बेसलाईन सर्वे* प्राज फाउंडेशन, पुणे आणि कॉज टू कनेक्ट फाउंडेशन ,पुणे यांच्या वतीने घेन्यात आला. मुलांना मनमोकळेपणाने यात सामील करून सर्वे पूर्ण केला.
आणि पुढील प्रात्यक्षिक ची सूचना देऊन आजचा दिवस संपन्न झाला.