*कोकण Express”
*नव्याने आढळले ८८ कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण…*
सिंधुदुर्गात आज तिघा वृद्धांचा कोरोनामुळे मृत्यू…
*जिल्हा शल्य चिकित्सक यांची माहिती*
*सिंधुदुर्गनगरी ता.०४:*
जिल्ह्यात आज कोरोनामुळे तिघा वृद्धांचा मृत्यू झाला असून नव्याने तब्बल ८८ रुग्ण आढळून आले आहेत.दरम्यान आतापर्यंत ६ हजार ५७३ कोरोना बाधीत रुग्ण बरे झाले असून सद्यस्थितीत जिल्ह्यात ६३८ रुग्णांवर उपचार सुरू आहेत.याबाबतची माहिती जिल्हा शल्य चिकित्सकांकडून देण्यात आली आहे.
मृतांमध्ये कुडाळ येथील ७५ वर्षीय वृद्ध पुरुष आहे.त्याला मधुमेह व उच्चरक्तदाबाचा त्रास होता.तसेच सावंतवाडी तालुक्यातील .न्हावेली येथील ६३ वर्षीय पुरुषाचा आणि देवगड-शिरगाव येथील ७४ वर्षीय पुरुष आहे त्याला मधुमेहाचा आजार होता.