*कोंकण एक्सप्रेस*
*सर्वांगसुंदर गायन, वादनात संगीत रसिक मंत्रमुग्ध !*
*कणकवली येथे आदर्श संगीत विद्यालयाच्यावतीने गुरुवंदना कार्यक्रम*
*कणकवली ः प्रतिनिधी*
आदर्श संगीत विद्यालय कणकवलीच्यावतीने गुरुपौर्णिमेनिमित्त आयोजित गुरुवंदना हा कार्यक्रम मोठ्या उत्साहात झाला. विद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी सादर केलेल्या सर्वांगसुंदर गायन, वादनात संगीत रसिक अगदी मंत्रमुग्ध झाले.
आदर्श संगीत विद्यालयाच्या गुरुवर्य वामनराव काराणे सभागृहामध्ये हा कार्यक्रम तीन सत्रामध्ये झाला.
पहिल्या सत्राचे औपचारिक उद्घाटन गुरुवर्य संगीत तज्ज्ञ बाळ नाडकर्णी, प्रा.हरिभाऊभिसे, पखवाज विशारद संदीप मेस्त्री,विद्यालयाचे संचालक संदिप
पेंडूरकर,संचालिक तेजस्विता पेंडूरकर, केशव पेंडूरकर यांच्या हस्ते झाले. यावेळी विद्यालयाच्या परीक्षा केंद्रातून पहिल्यांदा पखवाज विशारद ही पदवी प्राप्त करणारे
संदीप मेस्त्री, प्रा. हरिभाऊ भिसे यांचा सांगितिक कार्याबद्दल विद्यालयाच्या वतीने सत्कार करण्यात आला.
पहिल्या सत्रामध्ये श्रीवल्लभ साटम, अभिज्ञ देशपांडे,जिजा गावडे, यशराज पवार, चैतन्या गुरव, राधा कोरगावकर, आरोह पेंडुरकर, इशिता लाड, आद्या कारंडे,आरोही मेस्त्री,
राधा प्रभूझाट्ये, शिवम सावंत, तन्मय जाधव, देवांश गवस, विघ्नेश
खेमनाळकर,मिहीर पाटकर, स्नेहा मुसळे, विवान पाटील, युक्ता मेस्त्री, सिमरन
मुजुमदार, स्वरा राणे, प्रेम हर्णे, दुर्वांक पावसकर, कैवल्य सावंत, आराध्य
वाळके,जयेश राणे, पूर्वी करंबेळकर, मैत्रेयी हिर्लेकर, मेहा मेस्त्री, भार्गवी
जाधव,श्रीनिवास कृपाळ,चेतन भोगटे यांनी शास्त्रीय व सुगम संगीत गायन, वादन केले.
दुसऱ्या सत्राच्या सुरुवातीला कथ्थक विशारद गौरी कामत यांचा सुरेंद्र उर्फ
अण्णा कोदे,प्रियाली कोदे यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. या सत्रामध्ये
शरण्या राणे,हिमानी काणेकर,पद्मा नागवेकर,सुनेजा साटम,वर्षा
अभ्यंकर,आराध्य वाळके,ममता राणे, नभा गोवळकर, याज्ञवी कोदे, इरा नागवेकर,मनीष सोनुर्लेकर, प्रसन्न कांदळकर, संस्कार ठाकूर, रुद्र गोसावी, ओंकार परब,श्रीनिवास कृपाळ, स्वानंद काणेकर, तनय नातू, विराज राणे, सारा मोरजकर, शर्वरी असगेकर, श्रीनंद जोशी, प्राजक्ता ठाकूरदेसाई, साक्षी सुतार,कीर्ती गुरव, मुक्ता साईल, आर्या भाटवडेकर, स्वरांगी करंबेळकर, ऋचा वाळके,अद्वैत गवस,गौरेश कांबळे,श्रावणी कोकाटे,पारुल शिरोडकर,अंजली बापर्डेकर यांनी शास्त्रीय
व सुगम संगीत गायन, वादन केले.
तिसऱ्या सत्रामध्ये कणकवली तहसीलदार दीक्षांत देशपांडे ,गटशिक्षणाधिकारी किशोर गवस, ऍड.संदिप राणे यांची प्रमुख उपस्थिती लाभली. या सत्रामध्ये आरोही मेस्त्री,काव्या गवंडळकर,स्वानंद जोशी,वैदेही पावसकर,जीवल साटम,सलोनी मेस्त्री,अद्वैत रेवडेकर,स्वाती जोशी,स्मिता
आवटे,संपदा रेवडेकर,ध्रुव सावंत,मिनल केळुसकर , मृणाल गावकर,नेहा
देशपांडे,कुणाल गवंडळकर,स्वरांगी गोगटे,विदिता जोशी,मंथन चव्हाण यांनी शास्त्रीय व सुगम संगीत गायन, वादन केले.
यावेळी प्रत्येक सत्राची सांगता संदीप मेस्त्री यांचे पखवाज वादन, संदिप पेंडूरकर यांचे हार्मोनियम वादन व तेजस्विता पेंडूरकर यांचे शास्त्रीय गायन यांनी करण्यात आली.
संपूर्ण कार्यक्रमादरम्यान डॉ.मिनल नागवेकर, डॉ.विवेक रेवडेकर, डॉ. विनय
शिरोडकर,डॉ.मुक्तानंद गवंडळकर, पी. जे. कांबळे,गजेंद्र कृपाळ,सत्यवान कदम यांनी उपस्थित राहून शुभेच्छा दिल्या.
संपूर्ण कार्यक्रमासाठी श्रीधर पाचंगे, कुणाल गवंडळकर, गौरेश कांबळे, अद्वैत गवस, स्वानंद जोशी, अद्वैत, रेवडेकर,शेखर सर्पे, ध्रुव सावंत, विराज राणे, चेतन भोगटे,
तनय नातू ,स्वानंद काणेकर यांनी हर्मोनिअम व तबला साथ केली.
मीनल केळुसकर हिने आभार मानले.
फोटो ओळ – कणकवली येथे आदर्श संगीत विद्यालयाच्यावतीने आयोजित गुरुवंदना कार्यक्रमाच्यावेळी संदीप पेंडूरकर यांच्यासह अनेक विद्यार्थी उपस्थित होते.