रोजगाराभिमुख शिक्षणातून नव्या दिशा देण्याचे कार्य हे परम कर्तव्य:श्री.अजयराज वराडकर

रोजगाराभिमुख शिक्षणातून नव्या दिशा देण्याचे कार्य हे परम कर्तव्य:श्री.अजयराज वराडकर

*कोंकण एक्सप्रेस*

*रोजगाराभिमुख शिक्षणातून नव्या दिशा देण्याचे कार्य हे परम कर्तव्य:श्री.अजयराज वराडकर*

आज शैक्षणिक क्षेत्रात प्रचंड स्पर्धा निर्माण झाली आहे. या मुळे विद्यार्थी पालक समाज ही काही वेळेस हतबल झालेला दिसतो.ही परिस्थिती लक्षात घेऊन कट्टा पंचक्रोशी शिक्षण प्रसारक मंडळाने शालेय अभ्यासक्रमाबरोबर व्यवसायाभिमुख शिक्षण देण्याचे ठरविले.कट्टा परिसरातील रोजगाराविषयी गरजा व उदयोन्मुख उद्योजकांच्या भेटीतून आपल्याच भागात रोजगाराची संधी निर्माण करता आली तर अश्या विचाराने दश क्रोशीतील गुरामनगरी ,कुमामे,कुणकावळे, नांगरभाट ,गोळवण,पेंडुर, चाफेखोल,वडाचा पाट,नांदोस,तिरवडे,वराड,सुकळवाड, गावराई,पडवे, या परिसरातून शिक्षण घेण्यासाठी येणाऱ्या विद्यार्थ्यांना शालेय अभ्यासक्रमाबरोबर व्यावसायिक कौशल्य असणारे शिक्षण देऊन स्वावलंबी बनवू असा निर्धार बाळगला होता.हा निर्धार आज साध्य होताना दिसत असूनरोजगाराभिमुख शिक्षणातून नव्या दिशा देण्याचे कार्य हे परम कर्तव्य असून योगात्मा डॉ.काकासाहेब यांच्या प्रेरणेची ही शक्ती असून असेच कार्य आपण संस्था व सह कार्यांच्या मदतीने करू असे उद्गार बहुविध कौशल्य अभ्यासक्रम(MSFC) प्रमाणपत्र वितरण सोहळ्याच्या निमित्ताने कट्टा पंचक्रोशी शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष श्री. अजयराज वराडकर यांनी काढले.
या कार्यक्रमाच्या निमित्ताने संस्था सचिव सुनील नाईक यांनी अभ्यासक्रमातील विभागांतर्गत विद्यार्थ्यांनी घेतलेल्या मेहनतीचे कौतुक केले.या बरोबरच भविष्यातील नोकरीचा पर्याय म्हणून रोजगाराच्या संधी चे महत्व विषद करताना संस्थेने आर्थिक जोखीम उचलून केलेला प्रयत्न व त्याचबरोबर कार्यक्रमाच्या निमित्ताने प्रमाणपत्राच्या वितरणाच्या वेळी समाधान व्यक्त करताना श्री.अनिरुध्द बनसोड संस्थापक अध्यक्ष कॉज टू कनेक्ट यांचे ही मोलाचे सहकार्यबद्दल आभार मानले.या वेळी 70विद्यार्थ्यांना प्रमाणपत्राचे वितरण करण्यात आले.यामध्ये ध्रुवी महेश भाट(प्रथम क्रमांक)मयुरी दिनेश पेडणेकर, त्रिशा ऋषिकेश नाईक,हर्षल प्रकाश कानुरकर,कोमल अनिल गावडे(द्वितीय क्रमांक)वैष्णवी महादेव चव्हाण(तृतीय क्रमांक)यांनी यश संपादन केले.
सिंधुदुर्गात एकूण २४ प्रशालेत हे अभ्यासक्रम सुरू असून गेल्या दोन वर्षापासून ऊर्जा आणि पर्यावरण तंत्रज्ञान ,अन्नप्रक्रिया तंत्रज्ञान,बागकाम आणि शेती तंत्रज्ञान,अभियांत्रिकी तंत्रज्ञान विभागातील अभ्यासक्रमातील सातत्य हे प्रशंसास पात्र आहे.
या अभ्यासक्रमाचे निदेशक
प्रतिक्षा पोईपकर ,श्री.दत्तप्रसाद सांगेलकर ,श्री.राजेश कांबळी,
प्रियांका पेडणेकर ,संस्कृती अणावकर समन्वयक म्हणून श्री.भूषण विकास गावडे यांनी यशस्वीरित्या जबाबदारी पार पाडली आहे.
या कार्यक्रमाच्या निमित्ताने या विभागामार्फत प्रदर्शनाचे ही आयोजन करण्यात आले होते.कट्टा पंचक्रोशी शिक्षण प्रसारक मंडळ कट्टा च्या सचिव श्रीमती विजयश्री देसाई,शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष श्री.सुधीर वराडकर,खजिनदार रविंद्रनाथ पावसकर,संचालकसौ.स्वाती वराडकर,श्री.महेश वाईरकर सौ.स्मिता कॉम्प्युटर च्या संचालिका सौ.श्रध्दा नाईक मुख्याध्यापिका सौ.देवयानी गावडे पर्यवेक्षक श्री महेश भाट पालक हितचिंतक विद्यार्थी उपस्थित होते.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री.किशन हडलगेकर यांनी केले.
या उपक्रमातून गावी रहा मोठे व्हा या संकल्पनेला मूर्त रूप येत असून या बद्दल संकल्पनेचे प्रेर क विश्वस्त कर्नल श्री.शिवानंद वराडकर यांनी सदिच्छा दिल्या.याबरोबर विश्वस्त ॲड.श्री.एस एस पवार.उपाध्यक्ष श्री.आनंद मधुकर वराडकर,श्री.शेखर सदानंद पेणकर,सहसचिव श्री.साबाजी देविदास गावडे,रविंद्रनाथ पावसकर,संचालिका सौ.सुप्रिया वराडकर,सौ.श्रुती वराडकर,शिवराम गुराम,सल्लागारडॉ. व्ही .सी. वराडकर,सुहास वराडकर,व्हिक्टर डान्टस,प्रभाकर वाईरकर,संतोष साटविलकर,नारायण पेणकर. ॲड.ऋषी नाईक यांनी विद्यार्थ्यांच्या भावी वाटचालीस शुभेच्छा दिल्या.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!