*कोंकण एक्सप्रेस*
*हळवल-भाकरवाडी ते शिवडाव रस्त्याची दुरवस्था*
*कणकवली ः प्रतिनिधी*
तालुक्यातील हळवल – शिवडाव मार्गाची अतिशय दयनीय अवस्था झाली आहे. साधारणपणे १ कि. मी. अंतराचा रस्ता खड्डेमय झाला असून वाहनचालकांना जीव मुठीत घेऊन या मार्गावरून प्रवास करावा लागत आहे. शिवडाव हायस्कूलचे साधारणपणे ४०-४५ विद्यार्थी या मार्गावरून एसटी बसने प्रवास करतात. मात्र, या खड्ड्यांमधून बस चालविणे म्हणजे बस चालकांसाठी डोकेदुखी ठरत आहे. रस्त्यावर मोठ्या प्रमाणात खड्डे असल्याने अपघातांचा धोका आहे. या रस्त्याची तातडीने डागडुजी करण्याची मागणी होत आहे. या मार्गावर जंगली जनावरांचा देखील मोठ्या प्रमाणात वावर आहे. त्यात हा मार्गही खड्डेमय झाला आहे. त्यामुळे या मार्गावरून प्रवास करताना जीव मुठीत घेऊन प्रवास करावा लागत आहे. खड्ड्यांची स्थिती पाहता अपघाताची शक्यता नाकारता येत नाही. गणेशोत्सवात याच रस्त्यावरून गणेशमुर्त्या न्याव्या लागतात. हळवल भाकरवाडी ते राजवाडी शिवडाव मुख्य रस्ता जोडणारा हा मार्ग अक्षरशः खड्डेमय झाला आहे. गेल्या दोन वर्षांपासून या मार्गाचे डांबरीकरण करण्याची मागणी होत आहे. मात्र, अद्याप कोणतीही कार्यवाही झालेली नाही. मार्गावरून शिवडाव हायस्कूलची बसफेरी जाते. या बसने सुमारे ४० ते ४५ विद्यार्थ्यांची ने-आण केली जाते. स्थानिक लोकप्रतिनिधी, पदाधिकारी यांनी यात लक्ष देण्याची मागणी होत आहे. या रस्त्याचा काही भाग स्ट्रीट लाईटपासूनही वंचित असून त्याचीही व्यवस्था करण्याची मागणी होत आहे.