सिंधुदुर्गातील गरीब व गरजू रुग्णांनी ” मुख्यमंत्री सहाय्यता निधी ” योजनेचा फायदा घ्यावा : सुनिल कुंडगीर – मुख्यमंत्री सहायता निधी कक्ष ,सिंधुदुर्ग.

सिंधुदुर्गातील गरीब व गरजू रुग्णांनी ” मुख्यमंत्री सहाय्यता निधी ” योजनेचा फायदा घ्यावा : सुनिल कुंडगीर – मुख्यमंत्री सहायता निधी कक्ष ,सिंधुदुर्ग.

*कोंकण एक्सप्रेस*

*सिंधुदुर्गातील गरीब व गरजू रुग्णांनी ” मुख्यमंत्री सहाय्यता निधी ” योजनेचा फायदा घ्यावा : सुनिल कुंडगीर – मुख्यमंत्री सहायता निधी कक्ष ,सिंधुदुर्ग*

*मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित रक्तदान शिबीरात ” मुख्यमंत्री सहायता निधी ” योजनेची दिली माहीती .*

आर्थिक दृष्ट्या गरजु रुग्णांना तातडीच्या व अत्यावश्यक आजारांवर उपचार मिळणेकरीता मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांच्या संकल्पनेतून आणि राज्यस्तरीय कक्ष प्रमुख रामेश्वर नाईक यांच्या देखरेखीत ” मुख्यमंत्री सहायता निधी कक्ष ” जिल्हास्तरावर सुरु करण्यात आला आहे .
समाजातील गरिब व गरजु रुग्णांना दर्जेदार आरोग्य सुविधा उपलब्ध करून देणे , धर्मदाय रुग्णालया अंतर्गत मोफत उपचार करून देणे , महात्मा फुले जन आरोग्य योजना ,आयुष्यमान भारत योजनेसह इतर योजनांची माहीती व सुविधा रुग्णांना मिळवुन देणे तसेच योजनेच्या बाहेर असलेल्या रुग्णांना ” मुख्यमंत्री सहायता निधी ” अंतर्गत मदत पुरविणे हे या कक्षाचे प्रमुख उद्दीष्ट असल्याचे सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या कक्षाचे सुनिल कुंडगीर यांनी मार्गदर्शन केले .
तसेच या कक्षाद्वारे जिल्ह्यातील आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांना दुर्धर आजारांवर उपचार करण्यासाठी अर्थसहाय्य पुरविले जाते . तसेच पुर , दुष्काळ , आगीमुळे होणारे अपघात , मोठ्या नैसर्गिक आपत्तीमुळे बाधित नागरीकांना मुख्यमंत्री सहायता निधी मार्फत अर्थसहाय्य पुरविले जाते असे मार्गदर्शन केले .
यावेळी मुख्यमंत्री सहायता निधी साठी अर्ज करतेवेळी लागणारी कागदपत्रे तसेच या योजनेंतर्गत लाभ देण्यात येणाऱ्या आजारांची यादी बाबतची माहीतीचे फाॅर्म वाटप करण्यात आले .

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!