*कोंकण एक्सप्रेस*
*ओझरम-तीर्थवाडी येथे वाडीतील शिक्षण घेत असलेल्या मुलांसाठी करिअर मार्गदर्शन शिबीर संपन्न.*
*कासार्डे प्रतिनिधी : संजय भोसले*
कणकवली तालुक्यातील ओझरम तीर्थवाडी मधील विठ्ठल मंदिरात वाडीतील मुलांसाठी विठ्ठल रखुमाई मंदिर समिती (रजि) तीर्थवाडी, या संस्थे तर्फे करिअर मार्गदर्शन शिबिराचे आयोजन बुधवार दि. 16-07-25 रोजी संध्याकाळी 06.00 ते रात्री 08.00 या वेळेत मुंबईतील प्रख्यात करिअर मार्गदर्शिका सौ. वंदना नागरगोजे यांच्या मार्गदर्शनात संपन्न झाला. या वेळी वाडीतील पालक व मुले यांनी या मार्गदर्शनाचा लाभ घेतला. वाडीतील 35 पालक व मुले या वेळी उपस्थित होती.
या वेळी प्रमुख मार्गदर्शिका सौ. वंदना नागरगोजे यांचा गुलाब पुष्प देऊन सौ. पूजा अमित राणे यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला, तसेच श्री. गोपीनाथ नागरगोजे यांच्या सत्कार वाडीतील जेष्ठ सदस्य श्री. प्रभाकर राणे यांच्या हस्ते करण्यात आला. हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी विठ्ठल रखुमाई मंदिर समितीचे सदस्य श्री. बाबू वासुदेव राणे व श्री. जितेंद्र भिकाजी राणे यांनी विशेष प्रयत्न केले. या कार्यक्रमाचे पंचक्रोशीत कौतुक होत आहे.