*कोकण Express*
*सावंतवाडी राष्ट्रवादी युवक विधानसभेच्या अध्यक्षपदी शैलेश लाड…*
*आज पक्षात प्रवेश ;जिल्हाध्यक्ष प्रफुल्ल सुद्रिक यांची घोषणा…*
*बांदा ः प्रतिनिधी*
नेतर्डे येथील सामाजिक कार्यकर्ते शैलेश लक्ष्मीकांत लाड यांनी आज राष्ट्रवादी काँग्रेसचे युवक जिल्हाध्यक्ष प्रफुल्ल सुद्रीक यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादीत प्रवेश केला. त्यांच्या कार्याचा धडाका पाहून त्यांना तात्काळ सावंतवाडी युवक विधानसभा अध्यक्षपद देण्यात आले.
राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या कार्याने व विचाराने प्रेरित होऊन आपण राष्ट्रवादीत प्रवेश केल्याचे यावेळी श्री लाड यांनी सांगितले. राष्ट्रवादी हा सत्तेतील घटक पक्ष असल्याने सरकारच्या कल्याणकारी योजना सर्वसामान्य जनतेपर्यंत पोहचवून त्यांना स्वावलंबी करण्याचा निश्चय त्यांनी यावेळी व्यक्त केला.
यावेळी जिल्हा सरचिटणीस भास्कर परब, युवक जिल्हा उपाध्यक्ष प्रशांत पाताडे, मिलिंद घाडगे, अर्षद बेग, युवक जिल्हा सरचिटणीस ऍड. हितेश कुडाळकर, युवक जिल्हा चिटणीस सनी मोरे, सावंतवाडी युवक तालुकाध्यक्ष राजू धारपवार, कुडाळ-मालवण युवक विधानसभा अध्यक्ष सर्वेश पावसकर, सावंतवाडी युवक शहराध्यक्ष अभिजीत पवार, मालवण तालुकाध्यक्ष सिद्देश पाटकर यांच्यासह राष्ट्रवादी काँग्रेसचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.