मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त शिरोडा येथे रक्तदान करुन मुख्यमंत्र्यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त शिरोडा येथे रक्तदान करुन मुख्यमंत्र्यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा

*कोंकण एक्सप्रेस*

*मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त शिरोडा येथे रक्तदान करुन मुख्यमंत्र्यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा*

*५५ रक्तदात्यांनी रक्तदान करुन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना दिल्या ५५ व्या वाढदिवसाच्या शुभेच्छा !!!*

*२० जीवनदात्यांचा गौरव*

भारतीय जनता पार्टी, सिंधुदुर्ग यांच्या वतीने, मुख्यमंत्री मा. देवेंद्रजी फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त ” *रक्तदान करूया, समाजासाठी काहीतरी करूया* ” या प्रेरणादायी संकल्पनेतून वेंगुर्ले तालुक्यातील शिरोडा येथील उपजिल्हा रुग्णालयात रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले.
या शिबिरात ५५ जणांनी रक्तदान करत समाजासाठी आपली सामाजिक जबाबदारी पार पाडली.
शिबिराला भरघोस प्रतिसाद लाभला.
या उपक्रमात सहयोगी संस्था म्हणून सिंधु रक्तमित्र प्रतिष्ठान, वेताळ प्रतिष्ठान सिंधुदुर्ग, शिवप्रेमी ग्रुप-रेडी, तसेच ऑटो रिक्षा चालक-मालक संघटना, गांधी चौक, शिरोडा यांचा मोलाचा सहभाग होता. विशेष म्हणजे वेताळ प्रतिष्ठानचे हे सलग ३१ वे रक्तदान शिबिर ठरले.
शिबिराचे उद्घाटन सिंधुदुर्ग जिल्हा मध्यवर्ती बँकेचे अध्यक्ष मा. मनिष दळवी यांच्या शुभहस्ते करण्यात आले. यावेळी व्यासपीठावर जिल्हा उपाध्यक्ष प्रसन्ना देसाई, तालुकाध्यक्ष विष्णु उर्फ पप्पू परब , मा.तालुकाध्यक्ष सुहास गवंडळकर , जिल्हा निमंत्रित साईप्रसाद नाईक , महीला मोर्चाच्या सुजाता पडवळ , तालुका उपाध्यक्ष लक्ष्मीकांत कर्पे, माजी आरोग्य शिक्षण सभापती प्रितेश राऊळ , मा.उपनगराध्यक्ष अभि वेंगुर्लेकर , सोशल मीडिया जिल्हाध्यक्ष श्रीकृष्ण परब,जेष्ठ कामगार नेते प्रकाश रेगे , सर्व शक्तिकेंद्र प्रमुख मयूरेश शिरोडकर , महादेव नाईक , विजय बागकर , बुथ अध्यक्ष चंद्रशेखर गोडकर , प्रसाद परब ,अभय बर्डे , श्रीकृष्ण धानजी ,स्वप्निल तोरस्कर , मिलिंद साळगांवकर , शिरोडा शहर अध्यक्ष अमित गावडे , शिरोडा युवा मोर्चा अध्यक्ष सोमाकांत सावंत , भाजप लोकप्रतिनिधी सौ.हेतल गावडे , अर्चना नाईक , तातोबा कुडव , सौ.सायली कुडव , आसोली उपसरपंच संकेत धुरी , सुधीर नार्वेकर , पाल शक्तिकेंद्र प्रमुख कमलेश गावडे , अणसुर सरपंच सत्यविजय गावडे ,भाजप वेंगुर्ला युवा पदाधिकारी राहुल गावडे ,भाजप पदाधिकारी विजय पडवळ,महीला मोर्चाच्या सौ.गंधाली करमळकर, सौ.समृध्दी धानजी ,सौ.स्नेहा गोडकर , सौ.मनिषा भोपाळकर , संतोष अणसूरकर ,दादा शेटये , नंदू धानजी , सिध्देश अणसूरकर , देवेंद्र उर्फ बाळू वस्त , राहुल नाईक , सायमन आल्मेडा , संतोष सावंत आणि कार्यकर्ते त्याच प्रमाणे माजी शिरोडा सरपंच मनोज उगवेकर उपस्थित होते.
या कार्यक्रमाचे संयोजक जिल्हा उपाध्यक्ष प्रसन्न देसाई यांनी सिंधू रक्त मित्र प्रतिष्ठान , वेताळ प्रतिष्ठान तुळस , ऑटो रिक्षा चालक मालक संघटना गांधीचौक शिरोडा , शिवप्रेमी ग्रुप रेडी या सहयोगी संस्थांचाशाल व सन्मानचिन्ह देऊन तसेच उपस्थित कार्यकर्त्यांचा वृक्ष आणि प्रशस्तीपत्रक देऊन सन्मान केला‌.
या वेळी बोलताना मा. दळवी म्हणाले, “मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या जन्मदिनी रक्तदानासारखा विधायक उपक्रम राबवून भाजपा कार्यकर्त्यांनी आणि सहयोगी संस्थानी समाजसेवेचे प्रेरणादायी उदाहरण ठेवले आहे. रक्तदान हे माणुसकीचे प्रतीक असून अशा उपक्रमांतून तरुण पिढीला सामाजिक जाणीव जागृत होते.”
शिबिरात भाजपा सिंधुदुर्गच्या वतीने विशेष निमंत्रित २० रक्तदात्यांना शाल, पुष्पगुच्छ व सन्मानचिन्ह प्रदान करून ‘जीवनदाता पुरस्कार’ देण्यात आला.
हा सन्मान मिळाल्याने रक्तदात्यांच्या चेहऱ्यावर समाधानाचा भाव दिसून आला. सूत्रसंचलन प्रा. डॉ. सचिन परुळकर यांनी अभ्यासपूर्ण व प्रभावी पद्धतीने करत वातावरण सकारात्मक ठेवले.भाजपा च्या वतीने सर्व रक्तदात्यांचे, सहयोगी संस्थांचे आणि संयोजनात सहभाग घेतलेल्या कार्यकर्त्यांचे मन:पूर्वक आभार मानले.
शिबिर यशस्वी पार पडण्यासाठी रुग्णालय प्रशासन, आरोग्य कर्मचारी, भाजपा स्थानिक पदाधिकारी, कार्यकर्ते, व समाजसेवक यांनी संयमित आणि सहकार्यपूर्ण योगदान दिले.
या उपक्रमामुळे शिरोडा परिसरात सामाजिक चेतना वाढीस लागली असून, भविष्यात असे उपक्रम अधिक व्यापक स्वरूपात राबवले जातील, असा विश्वास संयोजकांनी व्यक्त केला .

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!