*साळशी प्रशालेत “रानभाजी- प्रदर्शन व विक्री ” महोत्सव -उत्साहात*

*साळशी प्रशालेत “रानभाजी- प्रदर्शन व विक्री ” महोत्सव -उत्साहात*

*कोंकण एक्सप्रेस*

*साळशी प्रशालेत “रानभाजी- प्रदर्शन व विक्री ” महोत्सव -उत्साहात*

*शिरगाव | संतोष साळसकर*

देवगड तालुक्यातील साळशी माध्यमिक विद्यामंदिर साळशी आयोजित प्रशालेच्या विद्यार्थ्यांचे ‘रानभाजी प्रदर्शन व विक्री ‘ हा अभिनव उपक्रम – महोत्सव, साळशी ग्रामपंचायत कार्यालयाच्या प्रांगणात उत्साही वातावरण संपन्न झाला.
प्रशालेच्या विद्यार्थ्यांना रानभाज्यांचे महत्त्व समजणे व त्यांचा सन्मान वाढवणे,विद्यार्थ्यांचे व्यावहारिक ज्ञान वाढवणे, त्यांच्या क्रियाशीलतेला प्रोत्साहन देणे, इ.या अभिनव उद्देशाने सदरचे उपक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.या उपक्रमात इ. -आठवी ते दहावीच्या सर्व विद्यार्थ्यांनी हिरीरीने सहभाग घेतला. प्रशालेच्या सर्व विद्यार्थ्यांनी शेवगा, अळू, टाकळा, कुरडू, कुडाच्या शेंगा आदी रानभाज्या प्रदर्शनासाठी व विक्रीसाठी ठेवल्या होत्या.
सदरच्या प्रदर्शनास साळशी पंचक्रोशीतील अनेक पालक, ग्रामस्थ व मान्यवर उपस्थित राहून अनेक रानभाज्याची खरेदी उत्साहाने केली. यामध्ये उपसरपंच पांडुरंग मिराशी, पोलीस पाटील सौ. कामिनी नाईक, संस्थेचे सदस्य -सुनिल गावकर, संतोष साळसकर, प्रभाकर साळसकर, मंगेश साळसकर, महिला बचत गटाच्या सौ. ऋतुजा घाडी इ.संस्था सदस्यांनी तसेच जि. प. प्राथ. शाळेचे सर्व शिक्षक व विद्यार्थी इ.नी प्रदर्शनास भेट देऊन या अभिनव उपक्रमाची स्तुती करत,रानभाज्यांची खरेदी उत्साहाने केली.

सदरच्या महोत्सवास प्रशालेचे मुख्याध्यापक माणिक वंजारे, संजय मराठे, पुरुषोत्तम साटम, स्वप्नील भरणकर उपस्थित होते. शेवटी मुख्याध्यापक माणिक वंजारे यांनी उपसरपंच पांडुरंग मिराशी व त्यांच्या सर्व कर्मचाऱ्यांचे सहकार्याबद्दल आभार मानले.अशा प्रकारे सदरचा हा रानभाजी प्रदर्शन व विक्री हा महोत्सव अतिशय खेळमेळीच्या व आनंदी वातावरणात संपन्न झाला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!