*उबाठा शिवसेनेच्या मालवण दांडी उपशहरप्रमुखपदी हेमंत मोंडकर यांची नियुक्ती*

*उबाठा शिवसेनेच्या मालवण दांडी उपशहरप्रमुखपदी हेमंत मोंडकर यांची नियुक्ती*

*कोंकण एक्सप्रेस*

*उबाठा शिवसेनेच्या मालवण दांडी उपशहरप्रमुखपदी हेमंत मोंडकर यांची नियुक्ती*

*दांडी शाखाप्रमुखपदी बाळा मिटकर व उपशाखाप्रमुखपदी भूषण आचरेकर*

*मालवण (प्रतिनिधी)*

शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या मालवण दांडी उपशहरप्रमुख पदी श्री. हेमंत मोंडकर यांची माजी आमदार वैभव नाईक, माजी जिल्हाप्रमुख भाई गोवेकर, तालुकाप्रमुख हरी खोबरेकर यांच्या प्रमुख उपस्थितीत निवड करण्यात आली. तसेच दांडी शाखाप्रमुख पदी श्री. बाळा मिटकर व दांडी उपशाखाप्रमुख पदी श्री. भूषण आचरेकर यांची नियुक्ती करण्यात आली. यावेळी नूतन पदाधिकाऱ्यांना पुष्पगुच्छ देऊन शुभेच्छा देण्यात आल्या.

शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या मालवण शहरातील पदाधिकारी आणि शिवसैनिकांची बैठक मालवण शासकीय विश्रामगृह येथे संपन्न झाली. या बैठकीत या पद नियुक्त्या करण्यात आल्या. यावेळी मालवण शहरप्रमुख बाबी जोगी, महिला तालुका समन्वयक पूनम चव्हाण, शहरप्रमुख रश्मी परुळेकर, युवतीसेना जिल्हा संघटक निनाक्षी शिंदे, शहर प्रवक्ते महेंद्र म्हाडगुत, युवासेना तालुका समन्वयक मंदार ओरसकर, माजी नगरसेवक महेश जावकर, बंड्या सरमळकर, सिद्धार्थ जाधव, सदानंद लुडबे, युवतीसेना शहरप्रमुख सुर्वी लोणे, माधुरी प्रभू, गणेश चव्हाण, साहिल जाधव, विनय कोळंबकर, किरण वाळके, अन्वय प्रभू, उमेश मांजरेकर, स्वप्निल आचरेकर, रवींद्र केळुसकर, विद्या फर्नांडिस, गजानन नेवाळकर, नीना मुंमबरकर, अक्षय रेवंडकर, गौरव वेर्लेकर, गणपत आडिवरेकर, किशोर गावकर, अक्षय गावकर, आशुतोष पाटील, रवी तळाशीलकर, मोहन मराळ, पॉली गिरकर चिंतामणी मयेकर आदिंसह शिवसैनिक उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!