*कोंकण एक्सप्रेस*
*मालवणात भाजपतर्फे आयोजित रक्तदान शिबिरास उत्स्फूर्त प्रतिसाद*
*मालवण (प्रतिनिधी)*
महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून मालवण शहर व तालुका भाजपाच्या वतीने रक्तदान शिबीर मामा वरेरकर नाट्यगृह, मालवण येथे संपन्न झाले. एस.एस.पी.एम. हॉस्पिटल पडवे आणि रोटरी क्लब मालवण यांच्या सहकार्यातून आयोजित या रक्तदान शिबिरास रक्तदात्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.
यावेळी भाजपा पदाधिकारी रोहन पेंडूरकर यांनी ६० वे रक्तदान केले. तर विशेष म्हणजे तारकर्ली पर्यटन विकास संस्था उपाध्यक्ष मिलिंद झाड, उद्योजक केदार झाड व त्यांच्या पत्नी तसेच भाऊ अश्या कुटूंबातील चार सदस्यांनी रक्तदान करून सामाजिक बांधिलकीचा वेगळा आदर्श दिला.
यावेळी भाजपाचे ज्येष्ठ पदाधिकारी विलास हडकर, जिल्हा उपाध्यक्ष अशोक सावंत, विजय केनवडेकर, मालवण तालुकाध्यक्ष धोंडी चिंदरकर, शहर अध्यक्ष बाबा मोंडकर, बाबा परब, माजी नगराध्यक्ष सुदेश आचरेकर, माजी नगरसेवक गणेश कुशे, आप्पा लुडबे, मंदार केणी, यतीन खोत, बबलू राऊत, पंकज सादये, व्यापारी संघ अध्यक्ष उमेश नेरुरकर, बाळू तारी, भाई कासवकर, भाजपा महिला तालुकाध्यक्ष माधुरी मसुरकर, शहर अध्यक्षा अन्वेषा आचरेकर, पुजा करलकर, ममता वराडकर, दर्शना कासवकर, पुजा सरकारे, सेजल परब, वैष्णवी मोंडकर, राणी पराडकर, महिमा मयेकर, अमिता निवेकर, स्मिता प्रभाळे, महानंदा खानोलकर, पुजा सरकारे, पुजा वेरलकर, नंदा सारंग, मेतर, कोळंब सरपंच सिया धुरी, रोटरी क्लब अध्यक्ष पंकज पेडणेकर, महादेव पाटकर, आबा हडकर, जि.प. माजी वित्त व बांधकाम सभापती महेंद्र चव्हाण, माजी सभापती अजिंक्य पाताडे, माजी उपसभापती राजू परुळेकर, प्रसाद मोरजकर, युवा मोर्चा जिल्हा उपाध्यक्ष राकेश सावंत, शहरअध्यक्ष ललित चव्हाण, महेंद्र पारकर, नारायण लुडबे, विक्रांत नाईक, महेश मांजरेकर, सचिन आंबेरकर, प्रमोद करलकर, संतोष गांवकर, दिपक सुर्वे, विजय निकम, केदार झाड, रोहन पेंडूरकर, किशोर खानोलकर, संदीप भोजणे, मिलिंद झाड, देवानंद लोकेगावकर, महादेव पाटकर, राम चोपडेकर, सहदेव साळगावकर, मांजरेकर, संमेश परब, मनोज मेथर, साजिद बांगी, साईनाथ वाघ, चेतन खोत, प्रवीण घाडीगावकर यांसह अन्य पदाधिकारी उपस्थित होते.