*कोंकण एक्सप्रेस*
*जिल्हा भाजपा आणि भजनी कलाकार संस्थेच्या वतीने जिल्हास्तरीय भजन स्पर्धेचे पालकमंत्री नितेश राणेंच्या हस्ते उद्घाटन*
*सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये भजन सदन उभारणार: मंत्री नितेश राणे*
*कुडाळ ः प्रतिनिधी*
सिंधुदुर्ग जिल्हा भाजप आणि भजनी कलाकार संस्थेच्या वतीने कुडाळ येथे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त जिल्हास्तरीय भजन स्पर्धेचे उद्घाटन मत्स्य व बंदरे विकास मंत्री तथा पालकमंत्री नितेश राणे यांच्या हस्ते झाले. यावेळी भाजपचे जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत भजनी कलाकार संस्थेचे जिल्हाध्यक्ष बुवा संतोष कानडे सुरेश सावंत कुडाळ तालुका अध्यक्ष संजय वेंगुर्लेकर ज्येष्ठ बुवा श्री. परब, मोहन सावंत, ज्येष्ठ बुवा श्री पारकर उपस्थित होते. यावी पालकमंत्री नितेश राणे यांनी सांगितले की लवकरच सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये भजन सदन उभे केले जाईल महायुती सरकार हे भजनी कलावंतांच्या खंबीरपणे पाठीशी उभे राहील कारण हिंदुत्वाचे विचार भजनाच्या माध्यमातून कायम ठेवण्याचा प्रयत्न या कलेतून होत आहे असे त्यांनी सांगितले.