*कोंकण एक्सप्रेस*
*चराठा ग्रामपंचायत सदस्या अॅना डिसोजा यांचा शिवसेनेत प्रवेश..*
*जिल्हाप्रमुख संजू परब यांनी पुष्पगुच्छ देऊन केले पक्षात स्वागत*
*सावंतवाडी ः प्रतिनिधी*
चराठा ग्रामपंचायतच्या सदस्या अॅना विल्सन डिसोजा यांनी आज अधिकृतपणे शिवसेनेत प्रवेश केला. सावंतवाडी येथे शिवसेना जिल्हाप्रमुख संजू परब यांनी त्यांचे पक्षात स्वागत केले. या पक्षप्रवेश सोहळ्याला बबन राणे, अशोक दळवी, सरपंच प्रचिती कुबल, उपतालुका प्रमुख संजय माजगावकर, शाखा प्रमुख राजन परब, उपविभाग प्रमुख राजू कुबल, क्लेटस फर्नांडिस, बूथ प्रमुख प्रशांत बिर्जे, अण्णा कोठावळे, रोहित परब, श्रावणी बिर्जे, बाळू वाळके, संतोष खरात, गौरी गावडे, एना लुसिझा डिसोझा आणि रुंदा मेस्त्री यांच्यासह अनेक शिवसैनिक उपस्थित होते. अॅना डिसोजा यांच्या प्रवेशाने चराठा परिसरात शिवसेनेची ताकद वाढण्यास मदत होईल असे बोलले जात आहे.
सावंतवाडी, ता. २१: काँग्रेसचे ज्येष्ठ नेते, शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष विकास सावंत यांनी माजी आरोग्यमंत्री कै. भाईसाहेब सावंत यांचा शैक्षणिक, सहकार, राजकीय व सामाजिक वारसा शेवटच्या श्वासापर्यंत जपला. त्यांनी अभ्यासू वृत्ती, वक्तशीरपणा, तत्वनिष्ठ पणा अंगिकार केला. शैक्षणिक प्रगतीत आर.पी. डी हायस्कूल अतिउच्च शिखरावर नेले अशा शब्दांत मान्यवरांनी भावना व्यक्त करत श्रद्धांजली वाहिली.
अखिल भारतीय मराठा महासंघाच्या वतीने शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष, काँग्रेस नेते विकास सावंत यांना श्रद्धांजली वाहण्यासाठी शोकसभेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी जिल्हाध्यक्ष अँड. सुहास सावंत, शिक्षण प्रसारक मंडळाचे सचिव सी. एल. नाईक, तालुका अध्यक्ष अभिषेक सावंत, शिवसेना माजी जिल्हाप्रमुख अशोक दळवी, तालुका प्रमुख नारायण राणे, माजी सभापती प्रमोद सावंत, शिक्षण प्रसारक मंडळाचे डॉ दिनेश नागवेकर, पुंडलिक दळवी, अमोल सावंत, प्रा. सतीश बागवे, अँड अनिल निरवडेकर, विलास सावंत, मनोहर देसाई, संजय लाड, अभिजित सावंत, श्री. बाळासाहेब नंदीहल्ली, अॅड. अनिल केसरकर, शैलेश नाईक, मनोज घाटकर, प्रसाद राऊत, आनंद नाईक, अँड संदीप निंबाळकर, माया चिटणीस, कौस्तुभ पेडणेकर, सुधीर पराडकर, अँड राघवेंद्र नार्वेकर, शांताराम गावडे आदी उपस्थित होते.
यावेळी सुहास सावंत म्हणाले, राजकीय वारसा असूनही संधी दुरावली गेली, मात्र त्यांनी माजी आरोग्यमंत्री कै. भाईसाहेब सावंत यांचा राजकीय, सामाजिक, शैक्षणिक वारसा जोपासला. मराठी क्रांती मोर्चात अमोल असे मार्गदर्शन केले. आर पी डी हायस्कूल उंचीवर नेऊन ठेवली. मराठा समाजाचे काम करताना रोड मॅप दिला. त्यांनी मोठेपणा कधीही दाखविला नाही. ते प्रसंगी कार्यकर्ते म्हणून राहिले. अनेक विद्यार्थी व शिक्षकांचे आधारस्तंभ बनले. ते समाजाचे दिपस्तंभ होते.
संदीप निंबाळकर म्हणाले, विकास सावंत शैक्षणिक व सामाजिक चेहरा म्हणून ओळखले जायचे. काँग्रेसचे असूनही त्यांनी राजकारणापेक्षा समाजकारण अधिक केले. शिवसेना माजी जिल्हाप्रमुख अशोक दळवी म्हणाले, लहानपणापासून विकासभाईना पाहतोय. माजी आरोग्यमंत्री के भाईसाहेब सावंत यांचा शैक्षणिक, राजकीय व सामाजिक वारसा त्यांनी जोपासला. सामाजिक बांधिलकी ठेवून त्यांनी काम केले. जिल्हा परिषद वित्त सभापती म्हणून अभ्यासपूर्ण काम केले.
भोसले नॉलेज सिटीचे कार्याध्यक्ष अच्युत सावंत भोसले म्हणाले, विकासभाई आमचे मार्गदर्शक होते. ते वेळोवेळी दिशादर्शक काम करत होते.
सुधीर पराडकर म्हणाले, मंत्र्यांचा मुलगा असूनही सर्वसामान्य माणूस म्हणून वावरले. मंत्रालयात गेलो तेथेही आदरतिथ्य केले. मोठेपणा दाखवणे त्यांचा स्वभाव नव्हता. ते अजातशत्रू होते. यावेळी अॅड अनिल निरवडेकर, विलास सावंत, शैलेश नाईक, अॅड संतोष सावंत, मनोहर देसाई, प्रा. सतीश बागवे, अँड राघवेंद्र नार्वेकर, शांताराम गावडे, श्री. पावसकर यांनीही श्रध्दांजली वाहिली. यावेळी सुरेश सावंत, दिगंबर नाईक, गोविंद सावंत, मेघश्याम काजरेकर, सुधाकर राणे, संदीप राणे, लवू गावडे, आशा कंटक, रवींद्र म्हापसेकर, राजेंद्र सावंत, विनय गायकवाड आदी उपस्थित होते.