कुडाळमधील खासगी रुग्णालयाच्या जनरेटरला आग : मोठा अनर्थ टळला कोणतीही हानी नाही…

कुडाळमधील खासगी रुग्णालयाच्या जनरेटरला आग : मोठा अनर्थ टळला कोणतीही हानी नाही…

*कोंकण एक्सप्रेस*

*कुडाळमधील खासगी रुग्णालयाच्या जनरेटरला आग : मोठा अनर्थ टळला कोणतीही हानी नाही…*

*कुडाळ ः प्रतिनिधी*

शहरातील एका खाजगी रुग्णालयाच्या जनरेटरमध्ये अचानक आग लागली, मात्र सुदैवाने रुग्णालयातील कर्मचाऱ्यांनी तातडीने केलेल्या उपाययोजनांमुळे आणि अग्निशमन दलाच्या जलद प्रतिसादाने मोठा अनर्थ टळला. काल सायंकाळी साडेचार वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली.

रुग्णालयाच्या बाहेर सुरक्षित ठिकाणी ठेवलेला जनरेटर, वीज नसल्याने सुरू होता. अचानक त्यातून धूर येऊ लागला. हे लक्षात येताच, रुग्णालयातील कर्मचाऱ्यांनी तात्काळ अग्निशमन सिलेंडरचा वापर करून आग विझवली.

दरम्यान दक्षता म्हणून नगरपंचायत आणि एमआयडीसीच्या अग्निशमन दलाला पाचारण करण्यात आले होते. दोन्ही अग्निशमन बंब तात्काळ घटनास्थळी दाखल झाले. एमआयडीसी पथकाने जनरेटरच्या ठिकाणी जाऊन पाणी मारून आग पूर्णपणे विझल्याची खात्री केली.

शॉर्टसर्किटमुळे ही आग लागल्याचे प्राथमिक चौकशीत समोर आले आहे. वेळीच आग विझविल्याने कोणतीही मोठी हानी झाली नाही आणि रुग्णालयातील रुग्णांसह सर्वांसाठी सुरक्षितता कायम राहिली. या घटनेमुळे काही काळ परिसरात धावपळ उडाली होती आणि नागरिकांनी घटनास्थळी गर्दी केली होती.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!