*कोंकण एक्सप्रेस*
*जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, सिंधुदुर्ग आणि कणकवली कॉलेज, कणकवली यांच्या संयुक्त विद्यमाने पंडित दिनदयाल उपाध्याय रोजगार मेळाव्याचे आयोजन*
*कणकवली ः प्रतिनिधी*
दिनांक २२ जुलै २०२५ रोजी जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, सिंधुदुर्ग आणि कणकवली कॉलेज, कणकवली यांच्या संयुक्त विद्यमाने पंडित दिनदयाल उपाध्याय रोजगार मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे.
या मेळाव्यात २४० पेक्षा अधिक विविध रिक्त पदांसाठी भरती होणार असून त्याच दिवशी थेट इंटरव्ह्यू घेण्यात येणार आहेत.
📍 स्थळ: कणकवली कॉलेज, कणकवली
🕚 वेळ: सकाळी ११ ते दुपारी ३
📧 संपर्क: sindhudurgrojgar@gmail.com
📝 तरी सर्व इच्छुक उमेदवारांनी या रोजगार मेळाव्याचा लाभ घ्यावा, ही विनंती.
आपले भवितव्य उज्वल करण्याची ही एक उत्तम संधी आहे!