*कोंकण एक्सप्रेस*
*मंत्री नितेश राणे यांनी जिल्हा परिषद कर्मचारी यांचे ओरोस मुख्यालय प्राथमिक शाळे मधील आयोजित एआय प्रशिक्षण वर्गाला दिली भेट*
*सिंधुदुर्ग*
माननीय पालकमंत्री महोदय श्री. नितेश राणे यांनी आज जिल्हा परिषद कर्मचारी यांचे ओरोस मुख्यालय प्राथमिक शाळे मधील आयोजित एआय प्रशिक्षण वर्गासाठी भेट दिली. त्यांचे या प्रशिक्षणास माननीय मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी स्वागत केले. या प्रशिक्षण वर्गात बाबत तसेच कर्मचाऱ्यांना कसे प्रशिक्षण दिले जात आहे व त्याचा प्रशासनात कसा वापर केला जाणार आहे .याबाबत थोडक्यात माहिती श्री. महेश शिंगाडे जिल्हा समन्वयक यांनी दिली.
माननीय मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी या प्रशिक्षणामागील हेतू व उद्देश्य स्पष्ट केले. जिल्हा परिषदेतील सुरुवातीला प्रत्येक विभागातील दोन तंत्रस्नेही कर्मचारी या प्रशिक्षणासाठी आपण घेतल्याची माननीय मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी या ठिकाणी नमूद केले व त्यांना याबाबत प्रशिक्षण देऊन प्रशिक्षित केले जाणार आहे असे बोलताना सांगितले.
तसेच या वर्गात पालकमंत्री
महोदयांनी स्वतः कर्मचाऱ्यांनी दिवसभरात आज प्रशिक्षणामध्ये नेमकी काय शिकत आहेत याची कर्मचाऱ्यांजवळ जाऊन माहिती घेतली व पुढील काळात आपल्याला सिंधुदुर्ग जिल्ह्यात प्रशासनात AI अधिक वापर करावयाचा असून त्यासाठी सर्वांना अधिक चांगले काम करण्यासाठी शुभेच्छा दिल्या.
यावेळी श्री.वीरेंद्र मार्गदर्शक ,श्री. गणपती कमळकर प्राथमिक शिक्षणाधिकारी सिंधुदुर्ग, श्री शोभराज शेर्लेकर. उपशिक्षणाधिकारी, श्री विठोबा परब. कनिष्ठ प्रशासनाधिकारी उपस्थित होते.