*कोंकण एक्सप्रेस*
*पंडित दीनदयाल उपाध्याय रोजगार मेळाव्याचे आयोयजन*
*सिंधुदुर्गनगरी दिनांक 21 (जिमाका) :-*
जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र सिंधुदुर्ग व कणकवली कॉलेज कणकवली यांच्या संयुक्त विद्यमाने पंडित दीनदयाल उपाध्याय रोजगार मेळाव्याचे दि. 22 जुलै रोजी सकाळी 11 वाजता कणकवली कॉलेज कणकवली येथे आयोजन करण्यात आले आहे. जिल्ह्यातील उद्योजक व उमेदवारांनी या रोजगार मेळाव्यात सहभागी व्हावे, असे आवाहन जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्राचे सहायक आयुक्त श्री.येरमे यांनी केले आहे.
जिल्ह्यातील उमेदवारांना रोजगार उपलब्ध करुन देण्यासाठी तसेच उद्योजकांना आवश्यक कुशल मनुष्यबळ प्राप्त करुन देण्यासाठी जिल्ह्यातील आणि जिल्ह्याबाहेरील नामांकित उद्योजक, इंडस्ट्रिजना या रोजगार मेळाव्यात आमंत्रित करण्यात आले आहे. जिल्ह्यातील आणि जिल्ह्याबाहेरी उद्योजकांकडे Accountant, Marketing Executive, Manager ,Service Manager, Back Office, Carpenter, Front office Assistant, Electrician, Mechanic, Fittr, Welder, Ac Repair, Plumber, Receptionist, Advisor, Supervisor, Cook, Waiter अशी विविध 266 पदे उपलब्ध आहेत. उद्योजक, आस्थापना 22 जुलै 2025 रोजी पंडित दीनदयाल उपाध्याय रोजगार मेळाव्यात कणकवली कॉलेज कणकवली येथे उपस्थित राहून उमेदवारांची इंटरव्ह्यू घेवून त्यांना त्याच ठिकाणी नियुक्तीपत्र देणार आहेत. या रोजगार मेळाव्यात सर्व शैक्षणिक कागदपत्रांसह उपस्थित राहून उमेदवारांनी संधीचा लाभ घ्यावा. अधिक माहितीसाठी 02362 228835, मोबा. 9403350689 किंवा ईमेल आयडी,sindhudurgrojgar@gmail.com वर संपर्क साधवा.
000000