*डिजिटल साक्षरता ही आजच्या तरुणांची खरी गरज -उपप्राचार्य डॉ. शरद शेटे यांचे प्रतिपादन*

*डिजिटल साक्षरता ही आजच्या तरुणांची खरी गरज -उपप्राचार्य डॉ. शरद शेटे यांचे प्रतिपादन*

*कोंकण एक्सप्रेस*

*डिजिटल साक्षरता ही आजच्या तरुणांची खरी गरज -उपप्राचार्य डॉ. शरद शेटे यांचे प्रतिपादन*

*देवगड महाविद्यालयात जागतिक कौशल्य दिन साजरा*

*प्रशांत वाडेकर: देवगड*

देवगड महाविद्यालयात जागतिक युवा कौशल्य दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात करिअर संसद अंतर्गत विद्यार्थ्यांचा मंत्रीपद शपथविधी सोहळा अत्यंत उत्साहात पार पडला.

या उपक्रमातून विद्यार्थ्यांमध्ये नेतृत्वगुण, सामाजिक जाणीव आणि निर्णयक्षमता विकसित करण्याचा प्रयत्न करण्यात आला. कार्यक्रमाचे आयोजन महाराष्ट्र राज्य उच्च व तंत्र शिक्षण विभाग व महाराष्ट्र माहिती तंत्रज्ञान सहाय्यता केंद्र यांच्या संयुक्त विद्यमाने राबविण्यात येणाऱ्या करिअर कट्टा उपक्रमांतर्गत करण्यात आले. या उपक्रमाचा उद्देश युवकांना करिअरच्या दृष्टीने योग्य दिशा दाखवणे तसेच सामाजिक-राजकीय प्रक्रियेची जाणीव निर्माण करणे हा आहे.

या प्रसंगी प्रमुख वक्ते म्हणून उपस्थित असलेले ज्येष्ठ प्रेरणादायक मार्गदर्शक उप प्राचार्य डॉ. शरद शेटे यांनी विद्यार्थ्यांना बदलत्या तंत्रज्ञानाच्या युगात आवश्यक असलेल्या बहुआयामी कौशल्यांबाबत मोलाचे मार्गदर्शन केले. त्यांनी “केवळ शैक्षणिक गुणवत्ता नव्हे, तर संवादकौशल्य, संघनियोजन, नेतृत्वक्षमता आणि डिजिटल साक्षरता ही आजच्या तरुणांची खरी गरज आहे” असे सांगत युवकांना स्वतःमध्ये आत्मविश्वास निर्माण करण्याचे आणि भविष्याचा आराखडा स्वतः आखण्याचे आवाहन केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!