पालकमंत्री ना. नितेश राणे यांच्या उपस्थितीत उबाठाच्या वाघेरी गावच्या सरपंच अनुजा राणे यांच्यासह असंख्य पदाधिकारी व कार्यकर्त्यांचा भाजपमध्ये प्रवेश

पालकमंत्री ना. नितेश राणे यांच्या उपस्थितीत उबाठाच्या वाघेरी गावच्या सरपंच अनुजा राणे यांच्यासह असंख्य पदाधिकारी व कार्यकर्त्यांचा भाजपमध्ये प्रवेश

*कोंकण एक्सप्रेस*

*पालकमंत्री ना. नितेश राणे यांच्या उपस्थितीत उबाठाच्या वाघेरी गावच्या सरपंच अनुजा राणे यांच्यासह असंख्य पदाधिकारी व कार्यकर्त्यांचा भाजपमध्ये प्रवेश*

*पालकमंत्री नितेश राणे यांच्या उपस्थितीत सामूहिक प्रवेश*

 *उबाठाच्या सरपंच अनुजा राणे यांच्यासह अनेक पदाधिकारी भाजपमध्ये*

*भाजपचे विधानसभा प्रमुख व स्थानिक पदाधिकाऱ्यांची विशेष उपस्थिती*

*कणकवली तालुक्यात भाजपची संघटनात्मक ताकद अधिक बळकट*

*वाघेरी गावात भाजपला मिळाला नवसंजीवनीचा उत्साह*

*कणकवली ः प्रतिनिधी*

कणकवली तालुक्यातील वाघेरी गावातील उबाठा व युवासेनेचे विविध पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी भारतीय जनता पक्षात जाहीर प्रवेश केला. यामध्ये उबाठाच्या कार्यकर्त्या व गावच्या सरपंच सौ. अनुजा राणे यांचा समावेश असून, उपसरपंच व इतर पदाधिकारीही भाजपमध्ये सहभागी झाले आहेत.

या सामूहिक प्रवेश सोहळ्याला महाराष्ट्र राज्याचे मत्स्यव्यवसाय व बंदर विकास मंत्री तथा पालकमंत्री नामदार नितेशजी राणे साहेब यांची प्रमुख उपस्थिती लाभली. या प्रवेशामुळे वाघेरीत उबाठाला मोठा राजकीय धक्का बसल्याचे बोलले जात आहे.

या वेळी वाघेरी गावच्या उबाठा सरपंच सौ. अनुजा अनंत राणे, उपसरपंच स्नेहल मंगेश नेवगे, सदस्य निधी नितीन राणे, युवासेना उपतालुका प्रमुख व माजी ग्रामपंचायत सदस्य प्रकाश वाघेरकर, माजी सदस्य मंगेश नेवगे, जयश्री वाघेरकर, संचालक गोपाळ कदम, तसेच निलेश वाघेरकर, राजेश कदम, रामदास कदम, एकनाथ वाघेरकर, दिनेश पेडणेकर, सुरेश कदम, साई नेवगे, संजय कदम, सिद्धेश कदम, संकेश कदम, मुकेश कदम, प्रवीण गुरव, सिद्धेश मोंडकर, अक्षय कदम, अमित पेडणेकर, सुलोचना वाघेरकर, चैताली कदम, शीतल कदम, दिव्या पेडणेकर, चैत्राली कदम, चित्रांगी कदम व सुवर्णा कदम यांनी भाजपमध्ये प्रवेश केला.

या कार्यक्रमाला भाजपचे विधानसभा प्रमुख श्री. मनोज रावराणे, मंडळ अध्यक्ष श्री. मिलिंद मेस्त्री, श्री. दिलीप तळेकर, श्री. पंढरी वायंगणकर व इतर पदाधिकारी उपस्थित होते.

या प्रवेशामुळे वाघेरी गावात भारतीय जनता पक्षाची संघटना अधिक मजबूत झाली असून, तालुक्यातील राजकीय समीकरणांवर याचा सकारात्मक परिणाम होईल, असा विश्वास व्यक्त करण्यात येत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!