बाहेरच्या पदाधिकारी व व्यक्तींनी संघटनेत ढवळाढवळ करु नये- जिल्हा प्रमुख बाबुराव धुरी

बाहेरच्या पदाधिकारी व व्यक्तींनी संघटनेत ढवळाढवळ करु नये- जिल्हा प्रमुख बाबुराव धुरी

*कोंकण एक्सप्रेस*

*बाहेरच्या पदाधिकारी व व्यक्तींनी संघटनेत ढवळाढवळ करु नये- जिल्हा प्रमुख बाबुराव धुरी*

*वेंगुर्ले ः प्रथमेश गुरव*

गेल्या काही दिवसात संघटनेत होत असलेली ढवळाढवळ ही संघटनेच्या हिताची नाही तर संघटनेचे नुकसान करणारी आहे तसेच आज संघटना पडत्या काळात असताना प्रत्येकाला विश्वासात घेत प्रत्येक शिवसैनिकाला ताकद गरजेचे आहे निवडणुकीमध्ये स्थानिक कार्यकर्त्यांना यश मिळवून देणे गरजेचे आहे असे असताना काही नेते संघटनेची शिस्त बिघडवत आहेत असा बेशिस्तपणा खपवून घेतला जाणार नाही संघटनेचे नुकसान होऊ देणार नाही संघटनेची जबाबदारी हे उद्धव साहेबांनी माझ्यावर दिलेली आहे त्यांची विश्वास आता जवळ प्रत्येक शिवसैनिकाला व जनतेला न्याय देण्यासाठी मी कटिबद्ध आहे त्यामुळे अशी ढवळाढवळ करणाऱ्या नेत्यांना योग्य तो समज घ्यावी व संघटनेचे नुकसान करू नये अन्यथा आम्हाला त्याच पद्धतीत उत्तर द्यावे लागतील. असा सडेतोड इशारा ठाकरे शिवसेनेचे जिल्हा प्रमुख बाबुराव धुरी यांनी पत्रकार परिषदेत व्यक्त केला.
या पत्रकार परिषदेच्या वेळी ठाकरे शिवसेनेच्या वेंगुर्ले येथील कार्यालयात सावंतवाडी विधानसभा मतदारसंघाचे प्रमुख रुपेश राऊळ, तालुकाप्रमुख यशवंत उर्फ बाळू परब, उपजिल्हाप्रमुख संदेश निकम, माजी जिल्हाप्रमुख तुषार सापळे, उपतालुकाप्रमुख उमेश नाईक, मतदार संघ महिला संघटिका सुकन्या नरसुले, तालुका महिला संघटिका साक्षी चमणकर, उभादांडा विभाग प्रमुख सुजित चमणकर, तुळस विभाग प्रमुख संदीप पेडणेकर, उभादांडा सरपंच निलेश चमणकर, दिलीप राणे, गजानन गोलतकर, दाभोली सरपंच उदय गोवेकर, उर्मिला निरावडेकर, चैताली बागायतकर, राजश्री शेळके राधिका मोचेमाडकर, स्वाती सावंत, महिला शहर संघटिका कोमल सरमळकर, अल्पसंख्यांक महिला संघटिका जस्मिन फणसोपकर आदींचा यावेळी समावेश होता.
उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे पक्षाध्यक्ष उद्धव ठाकरे यांचा दिनांक 27 जुलै रोजी वाढदिवस होत आहे त्यानिमित्त उद्धव ठाकरे शिवसेनेचा तर्फे सामाजिक उपक्रम राबवण्याचा साप्ताह हाती घेतला आहे या सप्ताहात सोमवार दिनांक 21 जुलै रोजी स्वच्छतेत कोकण विभागात प्रथम आलेल्या व राज्यात तृतीय आणि देशात 15 वी क्रमांक पटकावलेल्या वेंगुर्ले नगर परिषदेत मिळालेल्या पुरस्कारहा गौरवास्पद असून वेंगुरला नगर परिषदेच्या नागरिकांनी व नगरपरिषदेवर पदाधिकारी नसताना नगरपरिषद प्रशासनाने कर्मचाऱ्यांमार्फत घेतलेल्या परिश्रमाचे फलित आहे. त्यामुळे स्वच्छतेसाठी परिश्रम घेणाऱ्या नगरपरिषदेच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांचा सत्कार सकाळी 11 वाजता वेंगुर्ले उद्धव ठाकरे शिवसेनेतर्फे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित राहून करणार आहेत या कार्यक्रमास वेंगुर्ले शहरासह तालुक्यातील शिवसेनेच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी उपस्थित रहावे असे आवाहन शिवसेना जिल्हाप्रमुख बाबुराव धुरी यांनी केले आहे.
यावेळी ठाकरे सेनेचे सावंतवाडी विधानसभा मतदारसंघाचे प्रमुख रुपेश राऊळ यांनी मार्गदर्शन केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!