*कोंकण एक्सप्रेस*
*जिल्हास्तरीय वक्तृत्व स्पर्धेला उत्स्फूर्त प्रतिसाद*
*भंडारी कनिष्ठ महाविद्यालयाच्या सुवर्णमहोत्सवानिमित्त आयोजन*
*मालवण ः प्रतिनिधी*
भंडारी एज्युकेशन सोसायटी संचालित भंडारी कनिष्ठ महाविद्यालय मालवण च्या सुवर्णमहोत्सवा निमित्त आयोजित व माजी विद्यार्थी श्री. अनिकेत फाटक व सौ. अमृता फाटक पुरस्कृत तसेच माजी विद्यार्थी ऍड. प्रथमेश सामंत यांच्याकडून चषक पुरस्कृत असणारी जिल्हास्तरीय वक्तृत्व स्पर्धा भंडारी ए. सो. हायस्कुल व कनिष्ठ महाविद्यालय, मालवण येथे पार पडली. या स्पर्धेस जिल्हाभरातील विद्यार्थी स्पर्धकांचा प्रतिसाद लाभला. दोन्ही गटात मिळून ५१ स्पर्धकांनी सहभाग घेतला.
या स्पर्धेचे उदघाटन पुरस्कर्ते श्री. अनिकेत फाटक यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी भंडारी एज्युकेशन सोसायटीचे मुख्य कार्यकारी अधिकारी वामन खोत, लोकल कमिटी सचिव दशरथ कवटकर, मुख्याध्यापक हणमंत तिवले, पर्यवेक्षक आर. डी. बनसोडे, परीक्षक गुरुनाथ ताम्हणकर, ऍड. सौ. समीरा प्रभू, हृदयनाथ गावडे, चिंतामणी सामंत, प्रा. पवन बांदेकर, प्रा. दळवी, प्रा.सावंत, प्रा.गोसावी आदी उपस्थित होते. यावेळी वामन खोत व अनिकेत फाटक यांनी विचार मांडले. या स्पर्धेदरम्यान माजी विद्यार्थी व वृत्तनिवेदक श्री. ऋषी देसाई यांनी उपस्थित राहून शुभेच्छा दिल्या.
या स्पर्धेच्या यशस्वीतेसाठी माजी विद्यार्थी सौ. अमृता फाटक, भूषण मेतर, ऍड. पलाश चव्हाण, ऍड. प्रथमेश सामंत, हेमंत आचरेकर, सुविधा कासले, जितेंद्र केळुसकर तसेच कनिष्ठ महाविद्यालयाचे विद्यार्थी यांनी मेहनत घेतली. यावेळी विविध शाळा कॉलेजचे स्पर्धक विद्यार्थी, शिक्षक, पालक उपस्थित होते.
या स्पर्धेचा निकाल लवकरच जाहीर करण्यात येणार असून विजेत्यांना भंडारी कनिष्ठ महाविद्यालयाच्या दि. २६ जुलै रोजी होणाऱ्या सुवर्णमहोत्सव सांगता सोहळ्यात पारितोषिके देऊन गौरविण्यात येणार आहे, असे आयोजकांतर्फे सांगण्यात आले.