*कोंकण एक्सप्रेस*
*देवगड मेडिकल फाउंडेशनतर्फे आयोजित आरोग्य शिबिर यशस्वी*
*रामेश्वर परिसरातील ८० रुग्णांनी घेतला लाभ*
*देवगड ः प्रशांत वाडेकर*
देवगड मेडिकल फाउंडेशन तर्फे, रामेश्वर ग्रामपंचायत सभागृह, रामेश्वर येथे आयोजित मोफत आरोग्य तपासणी शिबिर यशस्वी पार पडले. या शिबिरात ८० हून अधिक रुग्णांनी लाभ घेतला.
या शिबिरात डॉ. रिया जैन आठवले , डॉ. सुनील आठवले आणि नॅब आय हॉस्पिटल, देवगड यांच्या तज्ज्ञ डॉक्टरांनी रुग्णांची तपासणी केली. देवगड मेडिकल फाउंडेशन चे कर्मचारी दशरथ हक्के , शकूर पीरखान , प्रसाद कदम , प्रसाद मेस्त्री , अक्षता नागवेकर , भूमिका परब , शेफाली भागवत , सुमेधा पालकर , राकेश कोयंडे सहभागी होते.
शिबिरात खालील मोफत निदान चाचण्या उपलब्ध करून देण्यात आल्या: हाडांची घनता तपासणी (BMD), फुप्फुस कार्यक्षमता चाचणी (PFT), ईसीजी (ECG), फिजियोथेरपी, डोळ्यांची मशीनद्वारे तपासणी, ब्लड शुगर (BSL R)
तसेच, नॅब आय हॉस्पिटल, देवगड यांच्या तज्ज्ञांनी मोतिबिंदू व डोळ्यांच्या इतर आजारांची तपासणी केली.
शिबिराच्या यशस्वी आयोजनासाठी डॉ. सुनील आठवले, संचालक, देवगड मेडिकल फाउंडेशन यांनी विशेष सहकार्य करणाऱ्या डॉ. गणेश पुजारे व श्री. मोहसीन बगदादी यांचे मनःपूर्वक आभार मानले.
देवगड मेडिकल फाउंडेशन भविष्यातही अशा उपयुक्त आरोग्य शिबिरांचे आयोजन करणार आहे, अशी माहिती डॉ. सुनील आठवले यांनी दिली.