*कोंकण एक्सप्रेस*
*मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त वेंगुर्ला तालुक्यात ” महारक्तदान संकल्प ” शिबिराचे आयोजन*
*वेंगुर्ला ः प्रतिनिधी*
मुख्यमंत्री मा. देवेंद्रजी फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त भारतीय जनता पार्टी, सिंधुदुर्गच्या वतीने महारक्तदान संकल्प शिबिर आयोजित करण्यात आले आहे. “रक्तदान करूया, समाजासाठी काहीतरी करूया” या प्रेरणादायी घोषवाक्याखाली हे शिबिर उपजिल्हा रुग्णालय, शिरोडा येथे मंगळवार, २२ जुलै २०२५ रोजी सकाळी ९ वाजता संपन्न होणार आहे.
सामाजिक जाणिवेतून आणि सेवा भावनेतून आयोजित करण्यात आलेल्या या शिबिरामध्ये स्थानिक नागरिक, तरुण वर्ग, स्वयंसेवी संस्था व विविध संघटनांचा उत्स्फूर्त सहभाग अपेक्षित आहे. सिंधुरक्तमित्र प्रतिष्ठान – वेंगुर्ले , वेताळ प्रतिष्ठान सिंधुदुर्ग तुळस, शिवप्रेमी ग्रुप – रेडी , ऑटो रिक्षा चालक-मालक संघटना गांधी चौक – शिरोडा , सोनसुरकर व्यायामशाळा – शिरोडा , शिवप्रेमी मित्र मंडळ आरवली टांक या संस्थांचा या उपक्रमात विशेष सहकार्य लाभले आहे.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे सामाजिक कार्य, संवेदनशील नेतृत्व आणि सर्वसामान्यांसाठी असलेली बांधिलकी ओळखून त्यांचा वाढदिवस समाजहितासाठी साजरा करण्याचा हा उपक्रम निश्चितच कौतुकास्पद आहे. त्यांच्या कार्यातून प्रेरणा घेऊन युवावर्गाने समाजोपयोगी कार्यात पुढे यावे, असा संदेशही या शिबिराच्या माध्यमातून देण्यात येत असल्याचे भाजपा जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत यांनी सांगितले.
विशेषतः या शिबिरात नियमित व प्रेरणादायी रक्तदान करणाऱ्या ‘निमंत्रित रक्तदात्यांचा’ विशेष सन्मान आयोजकांच्या वतीने करण्यात येणार आहे. त्यांच्या या योगदानामुळे अनेक रुग्णांना जीवनदान मिळाले असून, त्यांची सेवा समाजासाठी प्रेरणास्त्रोत ठरत आहे.
सदर शिबिरात सहभाग घेण्याचे आवाहन भारतीय जनता पार्टी, सिंधुदुर्गच्या वतीने करण्यात आले असून, “रक्तदान म्हणजे जीवनदान” हे लक्षात घेऊन जास्तीत जास्त नागरिकांनी पुढे येण्याचे आवाहन भाजपा जिल्हा उपाध्यक्ष प्रसंन्ना उर्फ बाळु देसाई व तालुकाध्यक्ष विष्णु उर्फ पपु परब यांनी केले आहे.