*कोंकण एक्सप्रेस*
*विद्यामंदिर माध्यमिक प्रशालेत पालकांच्या जागृतीसाठी भव्य योजनांचा जागर*
*कणकवली ः प्रतिनिधी*
विद्यामंदिर माध्यमिक प्रशालेत इयत्ता पाचवी ते दहावीच्या विद्यार्थ्यांच्या पालकांसाठी योजनांचा जागर हा शासनाचा उपक्रम राबविण्यात आला या कार्यक्रमासांठी सातशे पालक उपस्थित होते योजना शिक्षण विभाग सिंधुदुर्ग यांच्या मादर्शनाने प्रशालेत शासनाच्या विविध योजनांची माहिती देण्यात आली या कार्यक्रमाचे प्रास्ताविक श्री संदिप कदम सरांनी केले आणि कार्यक्रमांचे उद्दिष्टे कथन केली तसेच श्री जनार्दन शेळके सरांनी पाचवी व आठवी स्कॉलरशिप तसेच एनएमएमएस या योजनांचे मार्गदर्शन करून यासाठी आवश्यक असणाऱ्या कागद पत्राची माहिती करून दिली पर्यवेक्षक श्री अच्युतराव वणवे सरांनी संस्कृत भाषा शिष्यवृती सैनिक शिष्यवृती अल्पसंख्याक शिष्यवृती याविषयी सविस्तर मार्गदर्शन करून आवश्यक असणाऱ्या कागदपत्राची माहिती करून दिली प्रशालेचे मुख्याध्यापक श्री पिराजी कांबळे सरांनी समाज कल्याण योजनांची माहिती करून दिली तसेच सावित्रीबाई फुले शिष्यवृती मॅट्रीकपूर्व शिष्यवृत्ती या योजनांची माहिती आणि आवश्यक असणारी कागपत्रे या विषयी मार्गदर्शन करून पात्रता धारक पालकांना उत्पन्नाचा दाखला जातीचा दाखला कसा काढावा या विषयी मार्गदर्शन केले या कार्यक्रमाला शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष श्री तवटे साहेब चेअरमन डॉ . साळुंखे मॅडम सचिव श्री विजयकुमार वळंजू साहेब उपस्थित होते तसेच बहुसंख्येने पालक शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित .