*कोंकण एक्सप्रेस*
*बिळवस येथील श्री सातेरी देवी जलमंदिर जत्रोत्सवात माजी आमदार वैभव नाईक यांनी घेतले दर्शन*
मालवण तालुक्यातील बिळवस येथील श्री सातेरी देवी जलमंदिर येथे श्री सातेरी देवीचा जत्रोत्सव आज संपन्न होत असून कुडाळ मालवणचे माजी आमदार वैभव नाईक यांनी या जत्रोत्सवास उपस्थित राहून देवीचे दर्शन घेतले. तसेच जत्रोत्सवानिमित्त सर्व ग्रामस्थांना शुभेच्छा दिल्या. यावेळी देवस्थान मंडळाच्या वतीने त्यांचा शाल, श्रीफळ, पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला.
याप्रसंगी शिवसेना मसुरे विभागप्रमुख राजेश गावकर, पोईप विभागप्रमुख विजय पालव, युवासेना उपतालुकाप्रमुख अमित भोगले, रुपेश वर्दम, मसुरे युवासेना विभागप्रमुख राहुल सावंत,प्रत्युष भोगले, विकास दळवी, हर्षद परब, किशोर कासले, देवस्थान मंडळाचे पदाधिकारी, मानकरी,ग्रामस्थ उपस्थित होते.