*कोंकण एक्सप्रेस*
*उभादांडा न्यू इंग्लिश स्कूल च्या संघर्षाच एक चांगल फलित त्यांना मिळवून देणार : जिल्हा बँक अध्यक्ष मनीष दळवी*
*विद्यार्थी शिक्षक गुणगौरव समारंभ उत्साहात संपन्न*
*वेंगुर्ले : प्रतिनिधी*
संघर्षातून सुद्धा आपण पुढे आल पाहिजे यश मिळवलं पाहिजे ही जिद्द न्यू इंग्लिश स्कूल उभादांडा च्या संस्था चालकां बरोबर इथल्या शिक्षकांच्याही रक्तात आहे आणि तीच प्रेरणा इथल्या विद्यार्थ्यांनी घेतलेली दिसते. म्हणून या शाळेचे विद्यार्थी हे शालेय उपक्रमांबरोबरच विविध स्पर्धांमध्ये यश मिळवत आहेत, आणि जगाच्या पाठीवर कुठल्याही स्पर्धांमध्ये गेले तरी ते यशस्वी होतील यात शंका नाही. म्हणूनच संस्थेने केलेल्या सगळ्या संघर्षाच एक चांगल फलित त्यांना मिळवून देण्याचं अभिवचन सिंधुदुर्ग जिल्हा बँकेचे अध्यक्ष मनीष दळवी यांनी उभादांडा येथे बोलताना दिले.
न्यू एज्युकेशन सोसायटी उभादांडा संस्थेच्या उभादांडा न्यू इंग्लिश स्कूल मध्ये विद्यार्थी शिक्षक गुणगौरव समारंभ आयोजित केला होता. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून मनीष दळवी बोलले होते. यावेळी व्यासपीठावर संस्थेचे चेअरमन विरेंद्र कामत आडारकर, माझी समाज कल्याण सभापती अंकुश जाधव, परबवाडा गावचे उपसरपंच पपू परब, संस्थेचे सेक्रेटरी रमेश नरसुले, मुख्याध्यापक उमेश वाळवेकर, आत्माराम गावडे, शिक्षक तज्ञ रमेश पिगुळकर, राधाकृष्ण मांजरेकर, शिवराम आरोलकर, सुजित चमणकर, निलेश मांजरेकर, दाजी नाईक आदी उपस्थित होते.
कार्यक्रमाच्या प्रारंभी दीपप्रज्वलन आणि सरस्वती देवीचे पूजन करण्यात आले. त्यानंतर स्वागतगीत व उपस्थित मान्यवरांचे संस्थेच्या वतीने स्वागत करण्यात आले. गतवर्षी झालेल्या दहावीच्या परीक्षेत उत्तीर्ण गुणवंत विद्यार्थ्यांचा मान्यवरांच्या हस्ते बक्षीस ठेव योजनेतून सन्मान करण्यात आला. विद्यार्थ्यांबरोबरच मुलांना अध्यापनाचे धड घेणारे शिक्षक यांचाही सन्मान मान्यवरांच्या हस्ते करण्यात आला.
यावेळी बोलताना मनीष दळवी पुढे म्हणाले की, ज्या ठिकाणी अधिक संघर्ष असतो त्या ठिकाणी अधिक चांगल यश हे समीकरण आहे. आणि असते प्रत्यक्ष अनुभवता आले. खेळाचे मोठे मैदान नाही, रस्ता नीट नाही तरीही न डगमगता येथील विद्यार्थ्यांनी शिक्षकांच्या मार्गदर्शनाखाली केलेली सर्व विषयातील प्रगती वाखाण्य जोगी आहे. वेगवेगळ्या शाळांबरोबर वेगवेगळ्या संस्थांच्या माध्यमातून घेतलेल्या स्पर्धांमध्ये यशस्वी होणं आणि तिथे नावलौकिक टिकवणे ही काही सोपी गोष्ट नसते आणि हे या शाळेच्या विद्यार्थ्यांनी करून दाखवले आहे. यासाठी संस्थेबरोबर शिक्षकांनाही मनाचा मुजरा केला पाहिजे. दरम्यान येथील संघर्ष मिटवा यासाठी आम्ही वरिष्ठांच्या माध्यमातून नक्की प्रयत्न करू या कार्यात आम्हाला अनेकांचे सहकार्य ही लागेल असे यावेळी मनीष दळवी यांनी सांगून हायस्कूलच्या पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.
तर माझी सभापती अंकुश जाधव यांनी मार्गदर्शन करताना विद्यार्थ्यांनी मोबाईलचा सदुपयोग करावा दुरुपयोग करू नये. शिक्षकांच्या सल्ल्यानुसार शिक्षणात प्रगती करावी असा सल्ला दिला. प्रास्ताविक मुख्याध्यापक उमेश वाळवेकर यांनी केले. शाळेचा शैक्षणिक आढावा श्री बोडेकर सर यांनी घेतला. भिसे मॅडम यांनी गुणवंत विद्यार्थ्यांची माहिती दिली. यावेळी अन्य मान्यवरांनी आपले मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचलन व आभार वैभव खानोलकर सर यांनी मानले.