*कोंकण एक्सप्रेस*
*मुख्यमंत्री चषक भजन स्पर्धा 22 जुलै रोजी कुडाळ मध्ये*
*सिंधुदुर्ग:*
महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त येत्या 22 जुलै रोजी कुडाळ येथे मुख्यमंत्री चषक भव्य जिल्हास्तरीय भजन स्पर्धा आयोजित करण्यात आली असून या सोहळ्यामध्ये जिल्ह्यातील सर्व भजन प्रेमींनी सहभागी व्हावे असे आवाहन भजनी कलाकार संस्था सिंधुदुर्ग चे अध्यक्ष बुवा श्री संतोष कानडे यांनी केले आहे.
सिंधुदुर्ग जिल्हा भाजप आणि भजनी कलाकार संस्था सिंधुदुर्ग यांच्यावतीने ही स्पर्धा कुडाळ येथील महालक्ष्मी हॉलमध्ये आयोजित करण्यात आली असून
22 जुलै रोजी सकाळी नऊ वाजता या स्पर्धेला सुरुवात होणार आहे .या स्पर्धेत भाग घेणाऱ्या भजन मंडळांची निश्चिती 20 जुलै रोजी होणार आहे. भजनी कलाकार संस्था सिंधुदुर्ग ही अलीकडे नव्याने संस्था स्थापन करण्यात आली असून या संस्थेचे अध्यक्षपदी बुवा श्री संतोष कानडे यांची निवड करण्यात आली आहे.त्याशिवाय नवीन कार्यकारणी निवडण्यात आली आहे. जिल्हास्तरीय भजन स्पर्धा आयोजित करण्याचा निर्णय अलीकडच्या कार्यकारणी बैठकीत घेण्यात आला .
भजन स्पर्धेचे नियमावली जाहीर करण्यात आली आहे. त्यामध्ये सिंधुदुर्ग जिल्ह्यातील भजनांप्रमाणे भजन सादर करावे लागणार आहे. नीटनेटक्या व स्वच्छ पोशाखामध्ये दहा ते पंधरा इतकी मंडळी या स्पर्धेत मंडळामध्ये असणार आहे.
या स्पर्धेतील प्रथम क्रमांकाचे भजन मंडळाला 15 हजार रुपये, द्वितीय क्रमांकाच्या भजन मंडळास 11 हजार रुपये ,तृतीय क्रमांकाच्या भजन मंडळास 9000 रुपये असे बक्षीस जाहीर करण्यात आले आहे. उत्तेजनार्थ भजन मंडळास प्रथम 5000 रुपये आणि उत्तेजनार्थ भजन मंडळास द्वितीय 4000 रुपये असे पारितोषिक जाहीर करण्यात आले आहे. त्याशिवाय उत्कृष्ट तबलावादक, उत्कृष्ट गायक, उत्कृष्ट पखवाज वादक, उत्कृष्ट झांज वादक यांना प्रत्येकी 1 हजार रुपयाचे बक्षीस ठेवण्यात आले आहे.