*कोंकण एक्सप्रेस*
*दिव्यांग विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक जडणघडणीत स्कुल किटचा मोठा वाटा : अतिरिक्त जिल्हाधिकारी शुभांगी साठे*
*भाजपा दिव्यांग विकास आघाडीचे दिव्यांगासाठी करत असलेले कार्य कौतुकास्पद — प्रभाकर सावंत , भाजपा जिल्हाध्यक्ष* .
कोकण कला व शिक्षण विकास संस्था, मुंबई यांच्यावतीने आणि सिंधुदुर्ग साईकृपा अपंगशक्ती बहुउद्देशीय शिक्षण संस्था कसाल व भाजपा दिव्यांग विकास आघाडी यांच्या सहयोगाने आज ओरोस येथे वसंत स्मृती सभागृहात स्कुल किट वाटप करण्यात आले.
दिव्यांग विद्यार्थ्यांच्या शिक्षणाची वाट सुकर व्हावी, दिव्यांग असलेल्या पालकांच्या मुलांना मदतीचा हात मिळून त्यांची शाळा सुरु राहावी, ज्ञानार्जन घेऊन त्यांचे करिअर घडण्यास मदत व्हावी यासाठी यासाठी या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे असे प्रथमेश सावंत यांनी आपल्या प्रास्ताविकात सांगितले
कोकण कला व शिक्षण विकास संस्था, मुंबई यांच्या माध्यमातून प्रत्येक शैक्षणिक वर्षात हजारो विद्यार्थ्यांना शालेय साहित्य वाटपाचे उपक्रम राबविला जातो. यावर्षी हि आतापर्यंत सिंधुदुर्ग, पुणे, बीड,अहिल्याबाई नगर, ठाणे, रायगड सह अनेक जिल्ह्यात शैक्षणिक साहित्य वाटप संपन्न झाले असून याच वाटपाचा भाग म्हणून आज ओरोस येथे ५० शालेय दिव्यांग विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वाटप करण्यात आले. ग्रामीण भागातील गरजू विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी आवश्यक असलेलं शालेय साहित्य उपलब्ध करून देण्याच्या हेतूने हा उपक्रम राबवला जातो. अनेक वेळा आर्थिक अडचणीमुळे मुलांना पुस्तके, वह्या, पेन यांसारख्या मूलभूत गोष्टी मिळत नाहीत. त्यामुळे त्यांचा अभ्यासातला रस कमी होतो हे लक्षात घेऊन कोकण संस्था दरवर्षी हजारो विद्यार्थ्यांना मोफत शालेय किट्स वितरित करून त्यांना शैक्षणिकदृष्ट्या सक्षम करण्याचे कार्य करते.
*चौकट*
कोकण संस्थेच्या स्कुल किट या उपक्रमातून अनेक विद्यार्थी शेक्षणिक प्रवाहात येण्यास मदत होईल, दिव्यांग विदयार्थ्यांची गरज ओळखून संस्था करत असलेल्या त्यांची वाट सुकर होईल. कोकण संस्था करत असलेले सामाजिक उपक्रम जिल्ह्यातील गरजू विद्यार्थ्यांसाठी उपयुक्त ठरत आहे. *सिंधदुर्ग अतिरिक्त जिल्हाधिकारी शुभांगी साठे*
या कार्यक्रमाला अनेक मान्यवर उपस्थित होते, यामध्ये भाजपा जिल्हा उपाध्यक्ष प्रसंन्ना उर्फ बाळु देसाई , दिव्यांग आघाडी चे अनिल शिंगाडे , शामसुंदर लोट , कोकण संस्थचे प्रथमेश सावंत, कोकण संस्थेच्या गौरी आडेलकर, वैष्णवी म्हाडगूत आणि अनेक दिव्यांग विद्यार्थ्यांचे पालक उपस्थित होते.
समीर शिर्के यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक आणि अनिल शिंगाडे यांनी आभार मांडले.