*कोंकण एक्सप्रेस*
*कलमठमधील अनधिकृत बांधकामांवर कारवाई करा
गटविकास अधिकाºयांकडे कलमठ ग्रा. पं.सदस्य हेलन कांबळे यांची मागणी*
*कणकवली ः प्रतिनिधी*
कलमठ गावात विनापरवाना बांधकामे सुरू आहेत. या बांधकामांमुळे ग्रा. पं.चा महसूल बुडत आहे. ही बांधकाम करणाºयांना ग्रा.पं.च्या सत्ताधारी व ग्रा. प. प्रशानाकडून अभय मिळत आहे. त्यामुळे ग्रा. पं. कारभारात अनियमितत्ता व कर्तव्यात कसूर केल्याप्रकरणी व ग्रा. पं.चा महसूल बुडविणास मदत केल्याप्रकरणी सरपंच व ग्रामविकास अधिकारी यांच्यावर कायदेशीर कारवाई करावी, अशी मागणी गटविकास अधिकारी अरुण चव्हाण यांच्याकडे शिवसेना उबाठा पक्षाच्या ग्रा. पं.सदस्य हेलन कांबळे यांनी निवेदनाद्वारे केली आहे. १५ आॅगस्टपर्यंत सरपंच व ग्रामविकास अधिकाºयांवर कारवाई न झाल्यास पंचायत समिती कार्यालयासमोर मी आणि माझ्या सहकाºयांसह उपोषण करण्याचा इशारा त्यांनी दिला आहे.
निवेदनात म्हटले आहे की, कणकवली शहरालगत कलमठ गाव असल्याने याठिकाणी काही जणांकडून ग्रा. पं. परवानगी न घेता बांधकाम केली जात आहेत. या बांधकामांमुळे ग्रा. पं. महसूल बुडत आहेत. अनधिकृत बांधकामांबाबत ग्रा. पं. प्रशासनाकडे माहिती मागितल्या ती दिली जात नाही. अनधिकृत बांधकामांबाबत ग्रा. पं. प्रशासनाला माहिती दिल्यानंतर केवळ बांधकाम करणाºयांना नोटीस देण्यापलीकडे ग्रा. पं. प्रशासनाकडून कारवाई केली जात नाही. गावातील एका प्रतिष्ठीत व्यक्तीने ग्रा. पं. ची परवानागी न घेता बांधकाम केले आहे. याबाबत ग्रा. पं. प्रशासनाचे लक्ष वेधले. मात्र, त्यांच्यावर अद्यापही कारवाई केली नाही. त्यांच्यावर कारवाई करण्यासाठी ग्रा. पं. प्रशासनावर राजकीय दबाव आहे. त्यामुळे कारवाईकडे करण्यात प्रशासन धजावत नाहीत. कलमठ गावात अनधिकृतपणे बांधकामांना पेव फुटले आहे. या कामांमुळे ग्रा. प. महसूल बुडत आहे. ग्रा. पं. च्या कारभारात अनियमिततता व कर्तव्यात करून केल्याप्रकरणी सरपंच व ग्रामविकास अधिकाºयांवर कायदेशीर कारवाई करावी, अशी मागणी त्यांनी केली आहे. निवदेनाची कोकण विभागीय आयुक्त, जिल्हाधिकारी, जि. प.चे मुख्यकारी अधिकारी, उपमुख्य कार्यकारी अधिकारी, प्रांताधिकारी, पोलीस निरीक्षक यांना दिली आहे.