*कोंकण एक्सप्रेस*
*दत्त मूर्तीची सत्यता तपासणीचे पुरातत्व खात्याचे आदेश*
अभाअंनिसने केली होती मागणी*
- *कणकवली ः प्रतिनिधी*
जानवली कृष्णनगरी कणकवली येथील रहिवाशी मधुकर रामचंद्र मोहिते यांच्या मागील पडवीत खोदकाम करताना डिसेंबर 18 रोजी साडेचार फुटावर सदरची श्री दत्तगुरुंजी मूर्ती सापडल्याचे ओमकार मोहिते यांनी मीडियासमोर येऊन सांगितले होते .त्यानंतर या मूर्तीबाबत सोशल मीडिया वरून अनेकांनी त्याची अलौकिक, चमत्कारिक आणि दैवी प्रसिद्ध केली होती. की सतत चार महिने त्या जागी पाणी येत होते .ओलसरपणा असल्याने पाणी कोठून येते याची शहानिशा करण्यासाठी खोदाई केली असता साडेचार फूटावर सदरची मूर्ती सापडली . मूर्ती बाहेर काढताच पाणी यायचे बंद झाले . सदरची मूर्ती पूर्ण सोन्याची असून एका हाताने उचलल्यास जड लागते मात्र वजन काट्यावर ठेवली असता त्याचे वजन शून्य दाखविते . अशा या चमत्कारिक , अलौकिक आणि दैवी प्रसिद्धीमुळे अनेक भाविकानी येऊन त्या मूर्तीबाबतचे माहिती कुटुंबियाकडून घेऊन पुन्हा अनेकानी या दत्तमूर्तीचा देवस्थानचे व्हिडिओ बनविले आणि त्या व्हिडिओच्या आधारे या श्रीदत्त मूर्तीच्या देवस्थानची प्रसिद्धी जास्त प्रमाणात झाली . मात्र याच महिन्यात सदर मूर्ती सोन्याची असल्याचे मोहिते कुटुंबीयांनी पुन्हा येणाऱ्यां भाविकांना सदरची मूर्ती सोन्याची असल्याचे सांगितल्याने त्यातीलच कोणीतरी त्या मूर्तीची चोरी केली होती . मात्र काही दिवसातच ती मूर्ती पुन्हा आणून ठेवली . ही मूर्ती सापडल्यानंतर अखिल भारतीय अंधश्रद्धा निर्मूलन समिती सिंधुदुर्गचे जिल्हा संघटक विजय चौकेकर, अध्यक्ष ॲड राजिव बिले, सचिव अजित कानशिडे व अन्य सदस्यांनी सदरची मूर्ती जमिनीखाली सापडली असल्याने पुरातत्व खात्याच्या ताब्यात द्यावी. तसेच हि मूर्ती सोन्याचीच आहे का आणि तीचे वजन किती आहे ? तसेच पुरातन कालीन असल्याने किती वर्षापूर्वीची आहे याचा तपास करण्याची मागणी दक्षता अधिकारी तथा पोलीस निरीक्षक कणकवली यांची भेट घेऊन निवेदनाद्वारे केली होती . या बाबतचे निवेदन तहसिलदार साहेब कणकवली, पोलिस अधिक्षक साहेब सिंधुदुर्ग, जिल्हाधिकारी साहेब सिंधुदुर्ग आणि सहाय्यक संचालक पुरातत्त्व विभाग अभिरक्षित प्रादेशिक वस्तू संग्रहालय रत्नागिरी यांच्याकडे हि अशीच निवेदन देण्यात आली होती .
अभाअंनिस समितीच्या निवेदनाची तात्काळ दखल घेऊन डॉ . विलास वाहणे सहाय्यक संचालक ( पुरातत्व ) विभागीय कार्यालय रत्नागिरी यांनी पोलीस निरीक्षक पोलीस ठाणे कणकवली यांना तात्काळ पत्र पाठवून सदर प्रकरणाची सत्यता पडताळून त्याबाबतचा अहवाल या कार्यालयात पाठविण्यात यावा जेणेकरून सदर प्रकरणाबाबत या कार्यालयात सत्यता कळेल असे कळविले आहे .
पोलीस निरीक्षक यांना आता सदरची मूर्तीसोन्याचे आहे का ? या मूर्तीचे वजन किती आहे ? आणि पुरातत्त्व कालीन असल्याने ती किती वर्षांपूर्वीचे आहे हे सगळं कळवावे लागेल .ज्यामुळे मूर्तीबाबत पसरविण्यात आलेली चमत्कारिक ,अलौकिक, आणि दैवी शक्ती बाबतची सत्यता जनता समोर येईल .