*कोंकण एक्सप्रेस*
*कर्ले महाविद्यालयात करिअर संसदेचा शपथविधी सोहळा थाटात संपन्न*
*मुख्यमंत्रीपदी साक्षी शिद्रुक तर कौशल्य विकास मंत्री म्हणून मनस्वी नाईक यांची निवड*
*शिरगांव: संतोष साळसकर*
देवगड तालुक्यातील शिरगाव येथिल पुंडलीक अंबाजी कर्ले कला आणि वाणिज्य महाविद्यालयातील करिअर कट्टा विभागाच्या करिअर संसदेची १५ जुलै रोजी स्थापना करण्यात आली असून करिअर संसदेच्या मुख्यमंत्रीपदी साक्षी शिद्रुक तर कौशल्य विकास मंत्री म्हणून मनस्वी नाईक यांची निवड झाली आहे.
महाराष्ट्र राज्य उच्च व तंत्र शिक्षण विभाग आणि महाराष्ट्र माहिती तंत्रज्ञान सहाय्यता केंद्र यांच्या संयुक्त विद्यमाने महाविद्यालयामध्ये सुरू असणाऱ्या करिअर कट्टा या उपक्रमांतर्गत १५ जुलै रोजी जागतिक युवा कौशल्य दिनानिमित्त राज्यातील महाविद्यालयांमध्ये करिअर संसदेची स्थापना करण्यात आली.
करिअर संसदेतील ११ नवनियुक्त पदाधिकाऱ्यांना महाविद्यालयाचे प्राचार्य समिर तारी यांनी शपथ दिली. अध्यक्षस्थानावरून बोलताना प्राचार्य समीर तारी यांनी करिअर संसदेच्या पदाधिकाऱ्याच्या जबाबदाऱ्या व कर्तव्ये समजावून सांगताना करिअर संसदेच्या माध्यमातून महाविद्यालयीन विद्यार्थ्यानी उत्तम संघटन कौशल्य आत्मसात करून लोकशाही मूल्यांची जपणूक करावी. विद्यार्थ्यांनी आपल्या स्वप्नातील महाविद्यालय घडविण्यासाठी प्रत्येकाने योगदान देण्याची गरज असल्याचे मत व्यक्त त्यांनी केले. यावेळी करिअर कट्टाच्या नामफलकाचे अनावरण शिरगांव पंचक्रोशी शिक्षण प्रसारक मंडळ मुंबईचे अध्यक्ष अरुण कर्ले यांच्या हस्ते करण्यात आले. या सोहळ्यास कार्याध्यक्ष अँड. पी. व्ही. साटम, सरचिटणीस रघुनाथ चव्हाण, महाविद्यालयाचे चेअरमन संभाजी साटम, संस्थेचे पदाधिकारी व संचालक, महाविद्यालयाचे मानद अधिक्षक सुधीर साटम, महाविद्यालय विकास समितीचे सदस्य डॉ.राजेंद्र चव्हाण, शिरगाव हायस्कुल व कनिष्ठ महाविद्यालयाच्या शाळा समितीचे चेअरमन विजयकुमार कदम, मानद अधीक्षक संदिप साटम, करिअर कट्टा महाविद्यालयीन समन्वयक प्राध्यापिका अक्षता मोंडकर, करिअर कट्टा सहाय्यक प्राध्यापिका कोमल पाटील, प्राध्यापक आशय सावंत तसेच करीअर संसद नवनियुक्त पदाधिकारी व महाविद्यालयाचे प्राध्यापक,विद्यार्थी उपस्थित होते. सर्व नवनियुक्त पदाधिकाऱ्यांना उपस्थित मान्यवरांनी पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.
चौकट
२०२५-२६ या शैक्षणिक वर्षासाठी स्थापना करण्यात आलेल्या करिअर संसदेच्या मुखमंत्रीपदी साक्षी शिद्रुक, नियोजन मंत्री सिद्धी सावळे, कायदे व शिस्तपालन मंत्री वैभव झाजम, सामान्य प्रशासन मंत्री सानिका गोठणकर, माहिती व प्रसारण मंत्री मानसी भोगले, उद्योजकता विकास मंत्री अक्षय हिर्लेकर, रोजगार व स्वंयरोजगार मंत्री कशिश घाडी, कौशल्य विकास मंत्री मानसी नाईक, संसदीय कामकाज मंत्री श्रद्धा जावकर तर सदस्य म्हणून मित चौकेकर यांची निवड करण्यात आली. नवनियुक्त पदाधिकाऱ्यांना करिअर कट्टा दैनदिनी आणि प्रशस्तीपत्रक देऊन गौरविण्यात आले.