*चिंदर सडेवाडी प्रशालेचा ‘बांधावरची शाळा’ उपक्रम*

*चिंदर सडेवाडी प्रशालेचा ‘बांधावरची शाळा’ उपक्रम*

*कोंकण एक्सप्रेस*

*चिंदर सडेवाडी प्रशालेचा ‘बांधावरची शाळा’ उपक्रम*

*मालवण (प्रतिनिधी)*

जिल्हा परिषद प्राथमिक शाळा चिंदर सडेवाडी येथील विद्यार्थ्यांनी ‘बांधावरची शाळा’ हा उपक्रम गोसावी वाडी येथील शेतमळ्यात अनुभवला. यावेळी विद्यार्थी विविध शेती कामांमध्ये रमले.

अन्न पिकविणाऱ्या आणि आपले पोषण करणाऱ्या शेतकऱ्यांबद्दल आपुलकीची, आदराची वं मित्रात्वाची भावना सर्वच मुलांमध्ये असावी, तसेच सर्व मुलांना प्रत्यक्ष शेतीबाबत माहितीही मिळावी या हेतूने विद्यार्थ्यांसोबत बांधावरची शाळा हा उपक्रम राबविण्यात आला. शाळेच्या मुख्याध्यापिका सौ. शुभांगी लोकरे-खोत, शिक्षिका अन्नपूर्णा गायकवाड तसेच पालकवर्ग यांच्या सोबतीने आनंदाने मुले शेतात जमा झाली. चिंदर सडेवाडी प्रशालेतील बहुतांश मुले ही शेतकरी कुटुंबातीलच असली तरी शाळेतील सर्व विद्यार्थी, शिक्षक, पालक यांच्या एकत्रित सहभागातील हा अनुभव सर्वांसाठी अनोखा व आनंददायी ठरला.

विद्यार्थ्यांनी शेतकऱ्यांशी संवाद साधत माहिती जाणून घेतली. भात लावणी तसेच शेती बाबत प्रत्यक्ष अनुभव सर्वच मुलांनी एकत्रित अनुभवला. शाळा व्यवस्थापन समिती, शेतकरी या सर्वांच्या सहकार्यातून उपक्रम यशस्वी झाला.

या उपक्रमासाठी शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष किरण कांबळी सौ. प्रीती कांबळी, सौ. करिष्मा कानविंदे, सौ. सुहासिनी गोसावी, धनश्री गोसावी, मानसी गोसावी, सौ. स्वरा घागरे, सौ. आराध्य कांबळी, शेतकरी जयेश गोसावी, संतोष गोसावी, शामराव गोसावी, सौ. शैलेजा गोसावी व इतर पालक वर्ग यांचे सहकार्य लाभले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!