*कोंकण एक्सप्रेस*
*आर. के. फाउंडेशनच्या वतीने चाफेड गावात वृक्षारोपण*
*शिरगांव : संतोष साळसकर*
देवगड तालुक्यातील चाफेड ग्रामपंचायत, गावठण आणि भोगलेवाडी शाळेत शिरगाव येथील आर. के. फाउंडेशन या सामाजिक संस्थेच्या वतीने या संस्थेचे संस्थापक अध्यक्ष तथा भाजपा युवा मोर्चा देवगड तालुका अध्यक्ष अमित साटम यांच्या हस्ते विविध वृक्षांचे वृक्षारोपण करण्यात आले.
शिरगांव येथील आर. के. फाउंडेशन या सामाजिक संस्थेने गेली अनेक वर्षे विविध सामाजिक, सांस्कृतिक तसेच क्रीडा क्षेत्रात आपले नावलौकिक केले आहे. या संस्थेचे संस्थापक अध्यक्ष तथा भाजपा युवा मोर्चा देवगड तालुका अध्यक्ष अमित साटम यांच्या हस्ते चाफेड ग्रामपंचायतच्या आवारात वृक्षारोपण करण्यात आले.
यावेळी त्यांनी चाफेड गावठण आणि भोगलेवाडी शाळेला पण वृक्षारोपणासाठी विविध झाडे प्रदान केली. गावठण प्रशालेत सरपंच महेश राणे यांच्या हस्ते मुख्याध्यापिका सौ. गौरी नारकर तर भोगलेवाडी प्रशालेत अमित साटम यांच्या हस्ते शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष प्रफुल्ल परब यांच्याकडे ही झाडे देण्यात आली.
यावेळी ग्रामपंचायत सदस्य सुनील कांढर, सौ. सान्वी मेस्त्री, सौ. प्रतिभा मेस्त्री , माजी सरपंच आकाश राणे, संतोष साळसकर, माजी तंटामुक्त समिती अध्यक्ष विजय परब, ग्रामपंचायत अधिकारी हनुमंत तेरसे, शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष प्रफुल्ल परब, मुख्याध्यापक दयानंद पांडे, गावठण प्रशालेच्या मुख्याध्यापिका सौ. गौरी नारकर, विकास वाडीकर, अंगणवाडी सेविका सौ. लीलावती मेस्त्री, वर्षा राणे, प्रदीप घाडी, सचिन परब, महेश परब, स्वप्नाली परब, बंटी राणे आदी मान्यवर उपस्थित होते.
यावेळी सरपंच महेश राणे यांनी आर. के. फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष अमित साटम यांच्या या सामाजिक कार्याचे विशेष कौतुक करून त्यांचे आभार मानले.