*कोंकण एक्सप्रेस*
*सौं दीपिका दिनकर राणे यांची वजराठ गावाच्या *उपसरपंच पदी* बिनविरोध निवड ….*
*वेगुर्ला ः प्रतिनिधी*
वेंगुर्ला तालुका येथील वजराठ गावाच्या *उपसरपंच पदी* आघाडी च्या बाजूने *शरद पवार राष्ट्रवादी काँग्रेस पक्षांच्या वेंगुर्ला महिला तालुका अध्यक्ष सौं दीपिका दिनकर राणे* यांची बिनविरोध निवड करण्यात आली या आधीही त्यांनी सरपंच पद राष्ट्रवादी च्या बाजूने भूषविले आहे. एक कार्यतत्पर व मनमिळाऊ आणि प्रसंगी डॅशिंग कार्य कर्त्या तसेच सर्वांच्या सुख दुःखात सदैव सामील असणाऱ्या अशी ओळख असणाऱ्या एक महिला यांची निवडीवर सर्व गावातून शुभेच्छा देण्यात येत आहेत.
या प्रसंगी राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्ष्यातर्फे *सावंतवाडी विधानसभा मतदार संघ कोकण विभाग महिला अध्यक्ष अर्चना घारे परब , यांच्या नेतृत्वाखाली कार्यकर्ता रविकिरण गवस* यांच्या मार्गदर्शनानुसार वेंगुर्ला तालुका अध्यक्ष योगेश कुबल, युवक अध्यक्ष बंटी कांबळी, तालुका उपाध्यक्ष व मातोंड ग्रामपंचायत सदस्य विशाल बागायतकर, ग्रामकमिटी अध्यक्ष शेखर परब सचिन सावंत साई केरकर दोडामार्ग गौतम महाले इत्यादी कारकर्ते उपस्तित होते. पक्ष्याच्या वतीने सर्व ती परी ताकद ग्रामपंचायत ला देण्याचा शब्द श्री रविकिरण गवस यांनी दिला.