*कोंकण एक्सप्रेस*
*शिवनंदन थिएटर्स सांस्कृतिक मंचाचा शुभारंभ*
*मालवण ः प्रतिनिधी*
मालवणमधील सांस्कृतिक कला क्षेत्रात शिवनंदन थिएटर्स या नवीन सांस्कृतिक मंचाचा शुभारंभ मालवण येथील नगर वाचन मंदिर येथे झाला. नटराज पूजन व शिवनंदन थिएटर्स या मंचाच्या फलकाचे अनावरण करण्यात आले.
यावेळी जितेंद्र तिरोडकर यांनी या मंचाच्या माध्यमातून नवनवीन व दर्जेदार व्यावसायिक नाटकांची निर्मिती करून नाट्य रसिकांचे मनोरंजन करण्याचा आपण प्रामाणिक प्रयत्न करणार आहोत, असे सांगितले. यावेळी रोहित परूळेकर, संजय शिंदे, गणेश मेस्त्री, समीर शिंदे, कुणाल आंगणे, शुभदा टिकम, श्रीराज बादेकर, जितेंद्र केळुस्कर, साई करलकर, चिंतामणी सामंत, उमेश परुळेकर, गजानन मांजरेकर आदी उपस्थित होते.