*कोंकण एक्सप्रेस*
*बी.फार्मसी प्रवेश प्रक्रियेस २१ जुलैपर्यंत मुदतवाढ : भोसले फार्मसी कॉलेजमध्ये शासकीय प्रवेश सुविधा केंद्र….*
*सावंतवाडी ः प्रतिनिधी*
_महाराष्ट्र शासनाच्या सीईटी सेल मार्फत बी.फार्मसी प्रवेश प्रक्रियेला मुदतवाढ देण्यात आली असून नव्या परिपत्रकानुसार २१ जुलैपर्यंत विद्यार्थी अर्ज करू शकतात. ऑनलाइन अर्ज भरणे, कागदपत्र पडताळणी, त्रुटींची पूर्तता झाल्यावर अंतिम गुणवत्ता यादी ३१ जुलै रोजी जाहीर करण्यात येईल. त्यानंतर पसंतीक्रम आणि कॅप प्रवेश फेऱ्या सुरु होतील. यशवंतराव भोसले फार्मसी कॉलेजमध्ये शासकीय प्रवेश केंद्र क्र.३४८० सुरु असून याठिकाणी वरील सर्व सुविधा मोफत उपलब्ध आहेत._
_यशवंतराव भोसले कॉलेज ऑफ फार्मसी हे नॅक मानांकन प्राप्त आणि मुंबई विद्यापीठ संलग्न जिल्ह्यातील एकमेव फार्मसी महाविद्यालय आहे. इथे सीईटी सेलच्या मार्गदर्शक तत्वानुसार प्रवेश प्रक्रिया राबवली जात असून इच्छुक विद्यार्थ्यांनी या वाढीव मुदतीचा लाभ घ्यावा असे आवाहन प्राचार्य डॉ.विजय जगताप यांनी केले आहे._