*कोंकण एक्सप्रेस*
*विद्यामंदिर माध्यमिक प्रशालेत अमराठी भाषिक विद्यार्थ्यासाठी मराठी भाषेचे प्रशिक्षण*
*कणकवली ः प्रतिनिधी*
विद्यामंदिर माध्यमिक प्रशालेत भारतातील विविध राज्यातील विद्यार्थी शिक्षण घेत आहेत गुजरात ‘ बिहार ‘ उत्तरप्रदेश ‘ राजेस्थान ‘ कर्नाटक ‘ गोवा ‘ पंजाब ,हरियाना या राज्यातील विद्यार्थ्यांनी मराठी माध्यमाच्या शिक्षणासाठी प्रवेश घेतलेला आहे मुळातच त्यांची माध्यम भाषा त्यांच्या राज्याची आहे परंतु पालकांच्या व्यवसाया निमित्त तसेच कष्टकरी कामगार वर्ग या निमित्त कणकवली शहरात स्थिर झालेले आहेत कोणतंही मूल शाळाबाह्य राहाता कामानये यासाठी विविध राज्यातून प्रशालेत प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांना महाराष्ट्र राज्याची शिक्षणाची माध्यम भाषा मराठी यातूनच मुळाक्षरा पासून अक्षर ओळख बाराखडी जोडशब्द मुळाक्षरे लिहायला वाचायला शिकवून महाराष्ट्राच्या मराठी माध्यमाच्या शिक्षण प्रवाहात आणने हे महत्वाचे उद्दिष्ट्ये नजरेसमोर ठेवून प्रशालेचे मुख्याध्यापक श्री पी जे कांबळे सर व पर्यवेक्षक श्री अच्युतराव वणवे सर व सर्व शिक्षक वृंद यांनी एकत्र विचार विनिमय करून अमराठी भाषिक विद्यार्थ्यांना मराठी भाषेचे प्रशिक्षण वर्गांचे आयोजन करण्याचे ठरवून दररोज सकाळ संध्याकाळ एक तास मराठी भाषा शिकविण्याचे वर्ग घेतले जातात . त्याचा फायदा अमराठी भाषक विद्यार्थांना निश्चितच पुढील शिक्षणाच्या प्रवाहात होत असतो प्रशालेत अमराठी भाषक विद्यार्थी पाचवी ते दहावी पर्यंत ८० विद्यार्थी आहेत दररोज वाचन लेखन व सराव घेऊन त्यांच्या उज्वल भविष्यासाठी तयारी करून घेण्यात येते .