*कोंकण एक्सप्रेस*
*शिष्यवृत्तीमध्ये उभादांडा न्यू इंग्लिश स्कूलचे यश*
*वेंगुर्ला ः प्रथमेश गुरव*
नुकताच शिष्यवृत्ती परीक्षा २०२५चा निकाल जाहीर झाला असून यामध्ये ग्रामीण सर्वसाधारण गटातून जिल्हा गुणवत्ता यादीत उभादांडा न्यू इंग्लिश स्कूलच्या इयत्ता आठवीच्या विद्यार्थ्यांनी उज्ज्वल यश मिळविले आहे.
यात प्राजक्ता भोकरे हिने दुसरा क्रमांक, ईशा गिरप हिने २४वा क्रमांक, प्रतिक नाईक याने २९ वा क्रमांक प्राप्त केला असून ते शिष्यवृत्तीसाठी पात्र ठरले आहेत. तर श्रावणी नार्वेकर ही विद्यार्थीनीही उत्तीर्ण झाली आहे. या विद्यार्थ्यांना मुख्याध्यापक उमेश वाळवेकर, प्रा.भिसे, प्रा.मोहिते, प्रा.कुबल, अजित केरकर, दिपक बोडेकर, विद्या परूळेकर यांचे मार्गदर्शन लाभले. उत्तीर्ण विद्यार्थी व मार्गदर्शक शिक्षकांचे संस्थेतर्फे अभिनंदन केले आहे.