साळशी हायस्कूल मध्ये एस्.एस्.सी. मार्च- 2025 -प्रथम 3 क्रमांक प्राप्त विद्यार्थी सत्कार व नवीन प्रसाधनग्रृह उद्घघाटन- सोहळा उत्साहात संपन्न

साळशी हायस्कूल मध्ये एस्.एस्.सी. मार्च- 2025 -प्रथम 3 क्रमांक प्राप्त विद्यार्थी सत्कार व नवीन प्रसाधनग्रृह उद्घघाटन- सोहळा उत्साहात संपन्न

*कोंकण एक्सप्रेस*

*साळशी हायस्कूल मध्ये एस्.एस्.सी. मार्च- 2025 -प्रथम 3 क्रमांक प्राप्त विद्यार्थी सत्कार व नवीन प्रसाधनग्रृह उद्घघाटन- सोहळा उत्साहात संपन्न*

*शिरगाव : संतोष साळसकर*

देवगड तालुक्यातील साळशी हायस्कूलमध्ये एस. एस. सी मार्च २०२५ च्या परीक्षेत प्रथम तीन क्रमांक प्राप्त विद्यार्थ्यांचा सत्कार व अभिनंदन सोहळा,सर्व विद्यार्थी,पालक व मान्यवरांच्या उपस्थितीत आनंदात संपन्न झाला. या कार्यक्रमाची सुरुवात मान्यवरांच्या हस्ते दिप प्रज्वलनाने व सरस्वती पूजनाने झाली . प्रथम क्रमांक प्राप्त केतकी साळसकर हिचा सत्कार तिच्या वतीने तिच्या पालकांनी- सत्यवान सावंत (संस्था -अध्यक्ष )यांच्या हस्ते स्विकारला. द्वितीय क्रमांक प्राप्त मदार साळसकरचा सत्कार – त्यांच्या पालकांच्या उपस्थितीत प्रशालेचे मुख्याध्यापक- माणिक वंजारे सर यांच्या हस्ते सन्मानपूर्वक करण्यात आला . सोहम नाईक( दुसरा क्रमांक) याचा सत्कार संस्था सदस्य- संतोष साळसकर यांच्या हस्ते पार पडला.तृतीय क्रमांक प्राप्त दिव्या गावकरचा सत्कार स्कूल कमिटी चेअरमन सत्यवान भोगले यांच्या हस्ते देण्यात आला.या सर्व सत्काराचे स्वरूप रोख रक्कम,प्रशस्तीपत्र,सन्मान चिन्ह व गुलाब पुष्प हे होते. याच कार्यक्रमात इयत्ता आठवी मध्ये नवीन प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांच्या गणवेशांचे वाटप उपस्थित मान्यवर व पालकांच्या हस्ते करण्यात आले.याच कार्यक्रमांमध्ये सर्व सोयींनी युक्त विद्यार्थी नवीन प्रसाधनगृहाचे उद्घघाटन इयत्ता दहावी प्रथम तीन क्रमांक प्राप्त विद्यार्थ्यांच्या शुभ हस्ते,सर्व पालक, विद्यार्थी व मान्यवरांचे उपस्थितीत करण्यात आले. कार्यक्रमात प्रशालेचे मुख्या.- माणिक वंजारे, स्कूल कमिटी -चेअरमन सत्यवान भोगले व संस्था अध्यक्ष -सत्यवान सावंत यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करणारे व त्यांचा उत्साह वाढवणारे विचार व्यक्त केले. या कार्यक्रमात संस्था सदस्य, स्कूल कमिटी सदस्य, पालक, विद्यार्थी, सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते. शेवटी आभार प्रदर्शन स्वप्नील भरणकर केले. या पूर्ण कार्यक्रमाचे सूत्रसंचालन पुरुषोत्तम साटम यांनी केले.अशा प्रकारे दहावी विद्यार्थी सत्कार सोहळा,प्रसाधन गृह उद्घघाटन समारंभ व शिक्षक पालक सभा हा सयुक्त समारंभ,आनंदी व उत्साहाच्या वातावरण पार पडला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!