देवगड महाविद्यालयाच्या कॅडेटसची राज्यस्तरीय थल सैनिक (आर्मी) कॅम्पसाठी निवड

देवगड महाविद्यालयाच्या कॅडेटसची राज्यस्तरीय थल सैनिक (आर्मी) कॅम्पसाठी निवड

*कोंकण एक्सप्रेस*

*देवगड महाविद्यालयाच्या कॅडेटसची राज्यस्तरीय थल सैनिक (आर्मी) कॅम्पसाठी निवड*

*देवगड : प्रशांत वाडेकर*

५८ महाराष्ट्र बटालियन ओरोस येथे गेले दोन महिन्यांपासून सुरु असलेल्या एन. सी. सी. प्रशिक्षण कॅम्पमधून आणि चाचण्यांमधून सार्जंट संभाजी जकाप्पा माने (हिंदळे) आणि लान्स कॉर्पोरल मयुरेश सुनील पुजारे (मुणगे) यांची राज्यस्तरीय थल सैनिक कॅम्पसाठी निवड झाली आहे.
सार्जंट संभाजी मॅप रीडिंग या स्पर्धाप्रकरात पुढील प्रशिक्षणासाठी यवतमाळ येथे जाणार असून लान्स कॉर्पोरल मयुरेश हा ऑब्स्टेकल कोर्स या प्रकारासाठी अमरावती येथे जाणार आहे. कोल्हापूर, सांगली, सातारा, सिंधुदुर्ग आणि रत्नागिरी जिल्ह्यातील विविध महाविद्यालयांचे कॅडेट्स ओरोस येथील प्रशिक्षणामध्ये सहभागी होते. एन.सी.सी. ऑफिसर लेफ्ट. सुनेत्रा ढेरे आणि ५८ महाराष्ट्र बटालियनचे कमांडिंग ऑफिसर कर्नल दीपक दयाल, ॲडम. ऑफिसर लेफ्ट. कर्नल तनुज मंडलिक, सर्व आर्मी पी.आय. प्रशिक्षक यांचे मार्गदर्शन या विद्यार्थ्यांना लाभले. देवगड महाविद्यालयाच्या एन. सी. सी. युनिटसाठी ही अभिमानाची बाब असून या विद्यार्थ्यांचे महाविद्यालयाच्या संस्था पदाधिकाऱ्यांकडून, प्राचार्य, प्राध्यापकवृंद, कर्मचारीवृंद यांचेकडून अभिनंदन केले जात आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!