*कोंकण एक्सप्रेस*
*किल्ल्यांचा जागतिक वारसा यादीत समावेश झाल्याने मराठा महासंघ दोडामार्ग तर्फे आनंदोत्सव साजरा..*
*दोडामार्ग/शुभम गवस*
छत्रपती शिवाजी महाराजांच्या १२ किल्ल्यांचा युनेस्कोच्या जागतिक वारसा यादीत समावेश करण्यात आला आहे. त्यात सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मालवण व विजयदुर्ग किल्ल्यांचा समावेश आहे. अखिल भारतीय मराठा महासंघ दोडामार्ग तर्फे पिंपळेश्वर चौक दोडामार्ग बाजारपेठ येथे आनंदोत्सव साजरा करण्याय आला. सचिव भूषण सावंत यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक केले. मराठा महासंघ दोडामार्ग तालुकाध्यक्ष उदय पास्ते यांच्या हस्ते छञपती शिवाजी महाराजांच्या स्मारकाला पुष्पहार अर्पण करण्यात आला. त्यानंतर पेढे वाटून आनंदोत्सव साजरा करण्यात आला. तर फटाके लावून छत्रपती शिवाजी महाराजांच्या घोषणा देण्यात आल्या. यावेळी अखिल भारतीय मराठा महासंघ सिंधुदुर्ग जिल्हा उपाध्यक्ष सोनू गवस, दोडामार्ग तालुकाध्यक्ष उदय पास्ते, सचिव भूषण सावंत, खजिनदार सुशांत गवस, वैभव इनामदार, गोपाळ माजिक, रविंद्र खडपकर, प्रदिप गावडे, महेश गवस, सुदेश मळीक, कानू दळवी, श्रवणकुमार पुरोहित, प्रसाद रेडकर, संदिप घाडी, उमेश सावंत, समिर देसाई, प्रमोद गवस, समिर ठाकुर, तुळशीदास नाईक, गुरुदास नाईक आदी मराठा बांधव उपस्थित होते.